Home शहरे उस्मानाबाद बैलगाडी चोरटे मुद्देमालासह जेरबंद

बैलगाडी चोरटे मुद्देमालासह जेरबंद

0

उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । ५ जून : जयलक्ष्मी साखर कारखान्याच्या आवारातील बैलगाडी चोरट्यांना पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले आहे. अंदाजे पाऊण लाख रुपये किंमतीची बैलगाडी सोमवार ते गुरुवार १ जून ते ४ जून या कालावधीत चोरली होती.

या प्रकरणी तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेला या चोरट्यांची माहीती मिळताच पोलिसांनी पवारवाडी येथील रणजित सौदागर काळे, नितळी येथील तानाजी बंकट माने आणि काजळा येथील शिवा भीमराव भातलवंडे यांना मुद्देमालासह पकडले. चोरीच्या कामासाठी वापरण्यात आलेले ट्रॅक्टरही जप्त करण्यात आले आहे. पुढील तपासासाठी आरोपींना बेंबळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उप निरीक्षक आण्णाराव खोडेवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग सावंत, दिपक लाव्हरेपाटील यांच्या पथकाने केली आहे.