हायलाइट्स:
- अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या अफेअरच्या मागच्या बऱ्याच काळापासून सुरू आहेत चर्चा
- अथिया शेट्टीची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडियावर होतेय व्हायरल
- अथिया शेट्टी केएल राहुलसोबत इंग्लंडमध्ये असल्याचा लावला जातोय अंदाज
अथिया शेट्टीनं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. ज्यानंतर अथिया आणि राहुल इंग्लंडमध्ये एकत्र असल्याचं बोललं जात आहे. अथियानं सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. ‘तू सध्या राहुलसोबत इंग्लंडमध्ये आहे का?’ अशा आशयाचे प्रश्न सर्व चाहते तिला विचारताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना अथियानं त्याला ‘तुमची एनर्जी वाचवून ठेवा’ असं कॅप्शन दिलं आहे.
अभिनेत्रीने फोटो शेअर केल्यानंतर ती इंग्लंडमध्ये असल्याच्या चर्चा होऊ लागण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्याआधी केएल राहुलनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेले त्याचा फोटो होता. राहुलनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याच्या मागच्या बाजूला काही बॅरिकेट दिसत आहे आणि विशेष म्हणजे अगदी तसेच बॅरिकेट अथियाच्या फोटोमध्येही दिसत आहेत. त्यामुळे सध्या अथिया आणि राहुल इंग्लंडमध्ये एकत्र असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
अथिया शेट्टी आणि केएल राहुल खरंच इंग्लंडमध्ये एकत्र आहेत की नाहीत याची पुष्टी अद्याप झालेली नाही. पण अथियाच्या या फोटोवर सुनील शेट्टी, नव्या नवेली नंदा, आकांक्षा रंजन कपूर यांसारख्या अनेक सेलिब्रेटींनी कमेंट केल्या आहेत. सध्या भारतीय क्रिकेट टीम न्यूझिलंडसोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये आहे.