हायलाइट्स:
- ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ मध्ये साकारली होती सोयराबाईंची भूमिका
- ‘भ्रम’ चित्रपटातून करणार मराठी कलाविश्वात पदार्पण
- लवकरच श्रेयस तळपदे सोबत ‘लव्ह यू शंकर’ झळकणार
‘भ्रम’ या चित्रपटाचं दिग्दर्शन वैभव लोंढे करत असून हा एक भयपट असणार आहे. प्रेक्षकांना भीतीदायक अनुभव देणाऱ्या या चित्रपटात इलाक्षी मुख्य भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या सेटवरील अनेक फोटो इलाक्षीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इलाक्षीचे फोटो पाहून चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटात इलाक्षीसोबत अभिनेता अभि आमकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. इलाक्षीचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. त्यामुळे पारंपरिक वेशात इलाक्षीला पाहणारे चाहते आता तिच्या पुढील भूमिकेसाठी आतुर आहेत.
इलाक्षी एक डॉक्टर असून तिला अभिनयाची आवड आहे. इलाक्षी तिचे निरनिराळे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिला व्यायामाची प्रचंड आवड आहे. इलाक्षी व्यायामाचे अनेक व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता ‘भ्रम’ चित्रपटातील अभिनयाने इलाक्षी पुन्हा प्रेक्षकांची मनं जिंकून घेणार का, हे पाहणं औसुक्याचं ठरेल. इलाक्षी लवकरच अभिनेता श्रेयस तळपदे सोबत ‘लव्ह यू शंकर’ चित्रपटातही झळकणार आहे.