बॉलिवूड स्टार्सना सुरेश रैनाची नापसंती? स्वतःच्या बायोपिकसाठी सुचवली दाक्षिणात्य अभिनेत्यांची नावं

बॉलिवूड स्टार्सना सुरेश रैनाची नापसंती? स्वतःच्या बायोपिकसाठी सुचवली दाक्षिणात्य अभिनेत्यांची नावं
- Advertisement -


हायलाइट्स:

  • सुरेश रैनाचं पुस्तक ‘Believe : What Life and Cricket Taught Me’ नुकतंच झालं प्रकाशित
  • इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये सुरेश रैनानं त्याच्या बायोपिकबाबत केली चर्चा
  • आपल्या बायोपिकसाठी सुरेश रैनानं सुचवली दाक्षिणात्य अभिनेत्यांची नावं

मुंबई: भारतीय क्रिकेटर सुरेश रैना सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो अनेकदा इन्स्टाग्रामवरू त्याच्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसतो. नुकत्याच घेतलेल्या एका इन्स्टाग्राम सेशनमध्ये त्यानं त्याच्या बायोपकबद्दल सांगितलं. जर सुरेश रैनाच्या आयुष्यावर चित्रपट तयार होणार असेल तर त्यात दाक्षिणात्य आभिनेत्यांनी त्याची भूमिका साकारावी असं त्याला वाटतं. जर साऊथ सुपरस्टार्सनी आपली भूमिका साकारली तर ते त्याचं चेन्नई सुपर किंग्जसोबत असलेलं कनेक्शन व्यवस्थित समजू शकतील असं त्याचं म्हणणं आहे.

‘माझं ब्रेकअप झालंय काय करू?’ शाहरुखनं दिलं भन्नाट उत्तर

सुरेश रैना मागच्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज या संघाकडून खेळत आहे. त्यामुळे चेन्नई आणि या संघासोबत त्याचं एक खास नातं आहे. या संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीसुद्धा सुरेश रैनाचा खूप चांगला मित्र आहे. काही दिवसांपूर्वीच सुरेश रैनाचं पुस्तक ‘Believe : What Life and Cricket Taught Me’ प्रकाशित झालं. ज्यात त्यांनं किक्रेटनं त्याला आयुष्यात काय शिकवण दिली आणि त्याच्या आयुष्यात क्रिकेटचं किती योगदान आहे हे सांगितलं आहे.


मागच्या काही दिवसांपासून सुरेश रैना त्याच्या पुस्तकाचं प्रमोशन करताना दिसत आहे. ज्यासाठी तो इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये भाग घेत आहे. कमेंटेटर भावना बालाकृष्णन यांच्यासोबत सुरेश रैनानं नुकताच एका लाइव्ह सेशनमध्ये भाग घेतला. ज्यात त्यांनी सुरेश रैनाच्या बायोपिकबाबत चर्चा केली. त्यांनी सुरेशला, ‘तुझ्या बायोपिकसाठी तुझी भूमिका कोणी साकारावी असं तुला वाटतं असा प्रश्न केला. ज्यात उत्तर देताना सुरेश रैनानं बॉलिवूड कलाकारांची नावं न घेता त्या जागी दोन दाक्षिणात्य आभिनेत्यांची नावं घेतली.


आपल्या बायोपिक बद्दल बोलताना सुरेश रैना म्हणाला, ‘मला वाटतं एखाद्या दाक्षिणात्य सुपरस्टारनं माझी भूमिका साकारावी. कारण तिच व्यक्ती समजू शकते की, चेन्नई सुपरकिंग्जचं माझ्या आयुष्यात किती महत्त्व आहे. माझ्या डोक्यात दोन तीन नावं आहेत. मला वाटतं कि सूर्या शिवकुमार किंवा मग सलमान दुलकर यापैकी कोणी माझी भूमिका साकारावी आणि मला वाटतं ते करू शकतात. त्यांचा अभिनय खूपच उत्तम आहे.’ अर्थात बॉलिवूड अभिनेत्यांना बाजूला सारत सुरेश रैनानं अशाप्रकरे दाक्षिणात्य सुपरस्टार्सची नावं घेतल्यानं सुरेश रैनाला बॉलिवूड अभिनेते आवडत नाही का असा सवाल उपस्थित होत आहे.





Source link

- Advertisement -