Home मनोरंजन बोल्ड दृश्य शूट करताना भीती वाटली नाही कारण…; तापसीनं केला खुलासा

बोल्ड दृश्य शूट करताना भीती वाटली नाही कारण…; तापसीनं केला खुलासा

0
बोल्ड दृश्य शूट करताना भीती वाटली नाही कारण…; तापसीनं केला खुलासा

[ad_1]

० ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटातील भूमिकेचा अभ्यास कसा केलास?
– रानी कश्यप ही व्यक्तिरेखा माझ्या विचारांच्या अगदी विरुद्ध आहे. सिनेमातली रानी मीच असणार आहे हे मला समजवावं लागलं. कारण भूमिका आत्मसात केली जात नाही तोवर भूमिकेच्या तळाशी पोहोचता येत नाही. बरेच दिवस ती भूमिका जगल्यावर कुठे ना कुठे त्या भूमिकेच्या स्वभावातला काहीसा अंश तुमच्यात उतरतो.तुम्ही देखील तसाच विचार करता आणि वागता. खरं तर मला हा एक तोटा वाटतो कारण तुमच्यातला अंश न अंश बदलत जातो. प्रत्येक सिनेमानंतर माझ्याबरोबर हे घडतंच. पण प्रत्येक वेळी मी हे नुकसान झेलायला तयार आहे. कारण भूमिका अधिक वास्तववादी वठवण्यासाठी माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसतो. त्यामुळे माझी प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनात उतरवण्यासाठी त्या भूमिकेशी संवाद साधणं गरजेचं असतं आणि ते मी अत्यंत मेहनतीनं पार पाडते.
सुखी संसाराची २० वर्षे! सुबोध-मंजिरी भावे यांच्या लग्नाचे फोटो एकदा पाहाच!
० चित्रपटात बोल्ड दृश्यं आहेत. त्याची तयारी कशी केलीस?
– मी पहिल्यांदाच विक्रांत मेसी आणि हर्षवर्धन राणे यांच्याबरोबर काम केलं आहे. त्या दोघांबरोबर बोल्ड दृश्यं होते. अभिनय करताना सहजता यावी यासाठी मी पहिल्या दिवसापासूनच त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. माझ्या या गप्पिष्ट स्वभावामुळे माझ्याबद्दलचं त्यांचं मत काय झालं असेल याचा मी विचार केला नाही. कारण संहितेला न्याय देणं आणि भूमिका चांगल्या दृष्टीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. विक्रांत आणि हर्षवर्धन दोघेही माणूस म्हणून इतके चांगले आहेत की त्यांच्याबरोबर बोल्ड दृश्यांचं चित्रीकरण करताना भीती वाटली नाही.


० करोनाकाळात काम करताना भीती नाही का वाटली?
– अर्थातच भीती होती; पण चित्रपटात मुख्य भूमिका साकारतेय म्हटल्यावर मीच नकार देऊन कसं चालेल? तसं केलं असतं तर कितीतरी कलाकारांच्या आणि तंत्रज्ञाच्या मेहनतीवर, उत्पन्नावर पाणी फिरलं असतं. मी काम केल्यानं अनेकांना त्यांचा पगार मिळत असेल तर मी हे केलंच पाहिजे असं मला वाटलं. त्यामुळे चित्रीकरणासाठी परवानगी मिळाल्यावर मी लगेच होकार दिला. गेल्या वर्षी मी सप्टेंबरमध्ये चित्रीकरणाला सुरुवात केली. दुसऱ्या लॉकडाउनपर्यंत पाच चित्रपटांचं काम पूर्ण केलं. हे सर्व चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होतील. गेल्या लॉकडाउनमध्ये काम नसल्यानं अनेकांचं उत्पन्न थांबलं. त्यामुळे आताही चित्रीकरणाला सुरुवात झाली की मी लगेच कामाला लागणार आहे.

संकलन : संजना पाटील



[ad_2]

Source link