Home बातम्या ऐतिहासिक ब्राझिलियन जिउ-जित्सू या क्रीडा प्रकाराचा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते शुभारंभ

ब्राझिलियन जिउ-जित्सू या क्रीडा प्रकाराचा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते शुभारंभ

0
ब्राझिलियन जिउ-जित्सू या क्रीडा प्रकाराचा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई, दि. 26 : क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते आज वांद्रे येथील यूएफसी  या जिममधील ब्राझिलियन जिउ-जित्सू (BJJ) या क्रीडा प्रकाराचा शुभारंभ करण्यात आला.

श्री. केदार म्हणाले, कोरोना संकटामुळे प्रत्येकाला आरोग्याचे महत्त्व समजले आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. जिउ-जित्सू हा नवीन प्रकार आपल्या देशात आला आहे. स्वसंरक्षणासाठी हा क्रीडा प्रकार महत्त्वाचा ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. स्वतःचा बचाव करण्यासाठी जिउ-जित्सू हा विशिष्ट खेळ सर्वांना उपयुक्त ठरेल.

यावेळी जिउ-जित्सू असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष फरजाद पालिया, इस्तायाक अन्सारी उपस्थित होते.

0000000