Home ताज्या बातम्या भगवद्गीतेवरील आंतरराष्ट्रीय परिषदे चा समारोप

भगवद्गीतेवरील आंतरराष्ट्रीय परिषदे चा समारोप

0

जीवनात श्रद्धा ठेवा, कर्तव्य करा, इतरांना देण्यात आनंद माना : श्री दत्त विजयानंद तीर्थ स्वामी भगवद्गीतेवरील आंतरराष्ट्रीय परिषदे चा समारोप

पुणे : परवेज शेख

इंटरनॅशनल गीता फाऊंडेशन ट्रस्ट , अवधूत दत्त पीठम्( म्हैसूर ) आणि भारतीय विद्या भवन ( पुणे ) या संस्थांच्या वतीने पुण्यात आयोजित १७ व्या दोन दिवसीय  ‘ ग्लोबल गीता कॉन्फरन्स ‘  या भगवद्गीतेवरील आंतरराष्ट्रीय परिषदे चा समारोप रविवारी सायंकाळी झाला.

दिनांक १९ आणि २० ऑक्टोबर रोजी ही परिषद भारतीय विद्या भवन (सेनापती बापट रस्ता ,पुणे) येथे झाली . 

२० ऑक्टोबर सकाळी साडेनऊ पासून डॉ शैलजा कात्रे ,ब्रह्मचारिणी मैत्रयी चैतन्य ,श्री राघवन (बेंगळूरू ),श्री विजयानंद तीर्थ स्वामी ,श्री श्रीकान्थ (अमेरिका ) इत्यादी मान्यवरानी मार्गदर्शन केली . 

श्री दत्त विजयानंद तीर्थ स्वामी महाराज(म्हैसूर) यांच्या उपस्थितीत दुपारी ३ पासून समारोप सत्र सुरू झाले.भारतीय विद्या भवन , पुणे केंद्राचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे .डॉ.पी.व्ही. नाथ उपस्थित होते.विप्लव गांगुली यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ पी.व्ही. नाथ लिखित ‘तत्व मसी ‘ पुस्तकाच्या द्वीतिय आवृत्तीचे प्रकाशन यावेळी झाले.

श्री दत्त विजयानंद तीर्थ महाराज म्हणाले, ‘ गीतेचा १७वा अध्याय हा श्रध्देला समर्पित आहे. श्रध्दा असेल तर जीवनात सर्व गोष्टी शक्य होतात.३ प्रकारच्या श्रध्दा आहेत. त्यातील सात्विक प्रकारातील श्रध्दा असावी. स्वभावामुळे काही गोष्टी घडत नाहीत. पण, जीवनात पलायनवाद स्वीकारू नये. आपले जीवन कर्तव्य करणे हाच यज्ञ आहे. अपेक्षा न ठेवता कर्तव्य करावे. दानधर्मात, इतरांना देण्यात आनंद मानावा.

राजू परदेशी यांनी आभार मानले.