भयंकर! पाच वर्षाच्या बालिकेवर अल्पवयीन मुलांचा सामूहिक बलात्कार

- Advertisement -

 नवी दिल्ली:

नवी दिल्लीतील कापसहेडा भागात मानवतेला काळीमा फासणारी भयंकर घटना घडल्याचे समोर आले आहे. पार्कात खेळणाऱ्या एका पाच वर्षीय चिमुरडीवर तिच्याच दोन अल्पवयीन मित्रांनी सामूहिक बलात्कार केला आहे. आरोपींची वये अनुक्रमे 10 व 11 वर्ष आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास घडली असून या दोघा आरोपींची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. तर पीडित बालिकेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पीडीत मुलगी व आरोपी एकाच कॉलनीत राहतात. यामुळे मुलगी त्यांना ओळखत होती. मंगळवारी ती नेहमीप्रमाणे खेळावयास घराबाहेर गेली. तिथे तिला हे दोघे भेटले. दोघांनी तिला जवळच्या पार्कमध्ये खेळावयास जाऊ असे सांगत आपल्या सोबत नेले. पण तिथे गेल्यावर दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

दरम्यान, मुलगी बराचवेळ झाला तरी घरी न परतल्याने तिची आई तिला शोधत पार्कात गेली. तिथे घडत असलेला प्रकार बघून तिच्या पायाखालची जमिनच सरकली. तिने धावत जाऊन आरोपींच्या तावडीतून मुलीची सुटका केली. त्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. मुलीच्या आईने पोलिसात तक्रार केल्यानंतर दोघा आरोपींना अटक करण्यात आली. दोघेही अल्पवयीन असल्याने न्यायालयाने त्यांना बाल सुधारगृहात पाठवण्याचे आदेश पोलिसांना दिले. या घटनेमुळे पीडीत मुलीला जबर मानसिक धक्का बसला असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -