हायलाइट्स:
- सागरिकाने केला होता राज कुंद्राने न्यूड ऑडिशनची मागणी केल्याचा आरोप
- राजच्या विरोधात बोलल्याने सागरिकाला मिळत आहेत धमक्या
- ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून सागरिकाला विचारला जातोय जाब
राज कुंद्राच्या घराचं सर्व्हर आणि ७० पॉर्न व्हिडिओ जप्त
मिळतेय जीवे मारण्याची धमकी
सागरिकाने फेब्रुवारी २०२० मध्ये राजवर न्यूड ऑडिशनची मागणी केल्याचा आरोप केला होता. त्यावर फक्त प्रसिद्धीसाठी सागरिका हे बोलत आहे, असं स्पष्टीकरण राजने दिलं होतं. परंतु, आता राजला अटक झाल्यानंतर सागरिकाला अनेक माध्यमांद्वारे संपर्क करून धमकावण्यात येत असल्याचं तिने सांगितलं. सागरिकाने म्हटलं, ‘मी जेव्हापासून राज कुंद्रा विरोधात बोलली आहे, तेव्हापासून मी खूप वैतागली आहे. मला अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून कॉल येतायत. ते मला धमकी देत आहेत. मला वारंवार बलात्काराची आणि जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. मला लोक वेगवेगळ्या नंबर वरून फोन करून विचारतात की राजने काय चूक केली?’
होतायत व्यवसाय बंद पाडल्याचे आरोप
सागरिका पुढे म्हणाली, ‘मला सतत धमकीचे फोन येतायत. माझ्यावर त्यांचा व्यवसाय बंद पाडण्याचा आरोप केला जातोय. ते लोक म्हणतात की, तुम्ही अश्लील व्हिडिओ पाहता म्हणून आम्ही बनवतो. मला त्या लोकांपासून जीवाचा धोका आहे. त्यामुळे मी पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे.’ सागरिकाला राजचा सोबती उमेश कामत याने संपर्क केला होता. वेबसीरिजमध्ये काम देण्याच्या बहाण्याने सागरिकाकडे न्यूड ऑडिशनची मागणी करण्यात आली होती. सध्या राज पोलिसांच्या ताब्यात असून लवकरच या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.