Home गुन्हा भरदिवसा घरातून 15 तोळे सोन्याचे दागिने लंपास

भरदिवसा घरातून 15 तोळे सोन्याचे दागिने लंपास

0

कामशेत : कामशेत जवळील येवलेवाडी येथे राहणाऱ्या एका गृहस्थाच्या घरातून सोमवारी (दि. 10) दुपारच्या सुमारास 15 तोळे सोने व सात हजार रुपयांच्या रोख रकमेची चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे.

या प्रकरणी अविनाश तानाजी जाधव (वय 29, दर्पण सोसायटी, येवलेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवलेवाडी येथील दर्पण सोसायटीतील ‘सी’ विंगमधील फ्लॅट क्रमांक 15 मध्ये अविनाश जाधव राहतात. अविनाश जाधव हे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नीस घेऊन कामशेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले. पुन्हा दुपारी अडीच वाजता घरी गेले असता त्यांना त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले.

घरात जाऊन पाहणी केली असता घरातील लोखंडी कपाटातील ठेवलेले एक तीन टोळ्यांचे सोन्याचे गंठन, नऊ तोळे वजनाची सोनसाखळी, तीन तोळे वजनाचे सोन्याचे मनी, पट्यात असलेले गंठण व सात हजार रुपये रोख असा एकूण 3 लाख 82 हजारांच्या मुद्देमालाची चोरी झाली. पोलीस उपनिरीक्षक मृग्दीप गायकवाड तपास करीत आहेत.