Home गुन्हा भांडीवली येथून अवैधरीत्या खैराची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप वनविभागाकडून जप्त

भांडीवली येथून अवैधरीत्या खैराची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप वनविभागाकडून जप्त

( बोरघर ) माणगांव : ( विश्वास गायकवाड ) माणगांव तालुक्यातील भांडीवली येथील कालभैरव मंदिराजवळ खैराच्या लाकडांनी भरलेली बोलेरो पिकअप क्र. एम एच-०६-बी डब्लु-२२०७ ही गाडी पकडण्यात आली असून सदरची घटना २२ जुलै रोजी सांयकाळी ७.१५ ला घडली. वनक्षेत्रपाल रोहा पथकाचे आय. एस. कांबळी, वनपाल अशोक रैराशी, वनरक्षक अजिंक्य कदम, वाहनचालक बंटी वारंगे या पथका मार्फत सयूंक्त कारवाई करण्यात आली असून सदरच्या खैराच्या लाकडांची शासकीय किमंत ११४३२/- रु. असल्याचे या पथकाकडून माहिती देण्यात आली. या गाडीचा मालक व वाहनचालक नबील बशीर उबारे व या गाडीमध्ये माल भरणारा सोहेल सलीम मुरुडकर दोघेही रा. आंबेत यांना चौकशीसाठी वनविभाग रोहा यांनी ताब्यात घेतले असून सदरच्या खैराची लाकडे ही खाजगी मालकीच्या जागेतून तोडण्यात आली आहेत की शासकीय जागेत तोडण्यात आली आहेत याबाबतची जाग्यावर जाऊन रोहा गस्तपथक वनविभाग चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे