भाग्यश्री दिसतेय खूप ग्लॅमरस, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

- Advertisement -

भाग्यश्रीने नुकताच ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे.

भाग्यश्रीने नुकताच तिचा एक हॉट आणि बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत भाग्यश्री भलतीच ग्लॅमरस दिसतेय. भाग्यश्रीच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

भाग्यश्री लवकरच तमीळ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती बॅडमिंटनपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे.

भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट ‘काय रे रास्कला’ या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले.  यानंतर ती ‘माझ्या बायकोचा प्रियकर’, ‘काय रे रास्कला’ अशा चित्रपटात दिसली होती.

View this post on Instagram

Wanderer.🏖

A post shared by Bhagyashree Mote (@bhagyashreemote) on

भाग्यश्रीने तेलगू चित्रपट ‘चिकती गदीलो चिताकोटुडू’ या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. यात तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला होता.

भाग्यश्री मोटे लवकरच एका बॉलिवूड चित्रपटामधून लोकांसमोर येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहेत.

View this post on Instagram

🦄

A post shared by Bhagyashree Mote (@bhagyashreemote) on

हा चित्रपट पुढील वर्षी रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे २०१९ हे वर्ष भाग्यश्रीसाठी खास ठरणार आहे.

- Advertisement -