Home मनोरंजन ‘भाग मिल्खा भाग’ सिनेमा पाहून फरहानवर नाराज झाले होते नसिरुद्दीन शहा, कारण…

‘भाग मिल्खा भाग’ सिनेमा पाहून फरहानवर नाराज झाले होते नसिरुद्दीन शहा, कारण…

0
‘भाग मिल्खा भाग’ सिनेमा पाहून फरहानवर नाराज झाले होते नसिरुद्दीन शहा, कारण…

[ad_1]

मुंबई : भाग मिल्खा भाग‘ हा सर्वोत्कृष्ट आणि संस्मरणीय असा हिंदी सिनेमा म्हणून नावाजला जातो. प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या सिनेमाला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आज मिल्खा सिंग आपल्यात नाहीत. मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. आज प्रत्येकजण आपापल्यापरिने या श्रेष्ठ धावपटूला आदरांजली वाहत आहे.

मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर आधारीत ‘भाग मिल्खा भाग’ हा सिनेमा २०१३ मध्ये प्रसिद्ध झाला होता. या सिनेमामध्ये मिल्खा सिंग यांची भूमिका फरहान अख्तर याने साकारली होती. ही भूमिका साकारण्यासाठी फरहानने बरीच मेहनतही घेतली होती. फरहानने या भूमिकेसाठी जी मेहनत घेतली त्याचे कौतुक खुद्द मिल्खा सिंग यांनी देखील केले होते. इतकेच नाही तर ही भूमिका साकारण्यासाठी फरहानला त्यांनी मदतही केली होती. फरहानने या सिनेमात मिल्खा सिंग यांची साकारलेली भूमिका पाहून प्रत्येकाने त्याचे कौतुक केले होते. परंतु ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे मात्र हा सिनेमा पाहून फरहानवर नाराज झाले होते.

नसीरुद्दीन शहा यांच्या नाराजीचे कारण

नसीरुद्दीन यांच्या मते हा संपूर्ण सिनेमा कृत्रिम होता. ते म्हणाले होते, ‘मला हा संपूर्ण सिनेमा खोटा वाटला. फरहानने ही भूमिका साकारण्यासाठी जी मेहनत घेतली ती नक्कीच कौतुकास्पद आहे. परंतु केस वाढवणे आणि बॉडी वाढवून कुणालाही अभिनय करता येत नाही.’ याशिवाय नसीरुद्दीन यांनी मिल्खा सिंग यांनादेखील अनेक प्रश्न विचारले होते. नसीरुद्दीन पुढे म्हणाले की, ‘फरहानने किमान मिल्खा सिंग यांच्यासारखे दिसण्यासाठी तरी मेहनत घ्यायला हवी होती. मला माहिती आहे की मिल्खा सिंग यांना फरहानचा अभिनय आवडला आहे आणि त्यांना असे वाटते की हा सिनेमा त्यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. परंतु मिल्खा सिंग यांनी हा विचार केला का की फरहान जसा सिनेमात दिसतो आहे तसे ते दिसायचे का. त्यांच्याकडे १९६० मध्ये झालेल्या ऑलम्पिक खेळाचे फोटो नाहीत का? ‘

मिल्खा सिंग यांना आवडला होता सिनेमा

भले ही नसीरुद्दीन यांना ‘भाग मिल्खा भाग’ हा सिनेमा आवडला नाही परंतु मिल्खा सिंग यांना त्यांच्या जीवनावर आधारीत असलेला हा सिनेमा खूपच आवडला. फरहानने या सिनेमात केलेल्या अभिनयाचे आणि त्यासाठी घेतलेल्या कठोर मेहनतीचे भरभरून कौतुक केले आहे. मिल्खा सिंग म्हणाले होते, ‘ मी फरहानला स्क्रीनवर माझ्यासारखा पाहू इच्छित होतो. तो खरोखरच मोठ्या स्क्रीनवर माझ्यासारखाच दिसला आहे. याचे संपूर्ण श्रेय सिनेमाचे दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहरा यांना जाते. माझी भूमिका साकारण्यासाठी फरहानची निवड त्यांनी केली, त्याच्यामध्ये त्यांनी मला पाहिले. सिनेमामध्ये फरहानने खूपच छान काम केले आहे. या सिनेमासाठी फरहानने ज्या पद्धतीने स्वतःला घडवले ती गोष्ट सोपी नव्हती.’ या सिनेमामध्ये सोनम कपूर आणि दिव्या दत्ता यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका होत्या.

संपूर्ण देशाने वाहिली मिल्खा यांना आदरांजली

प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचे १८ जून रोजी रात्री ११.३० वाजता करोनामुळे निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. मिल्खा सिंग यांच्यावर चंडीगढमधील पीजीआय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच रविवारी मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे निर्मला सिंग यांचेदेखील करोनामुळे निधन झाले होते. त्या ८५ वर्षांच्या होत्या.

[ad_2]

Source link