Home शहरे मुंबई भाजपचं एक पाऊल पुढे; शिवसेनेला दिली ही मोठी ऑफर!

भाजपचं एक पाऊल पुढे; शिवसेनेला दिली ही मोठी ऑफर!

0

मुंबई : मुख्यमंत्रीपद हवं म्हणून शिवसेना आग्रही आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेनेला मोठी ऑफर देऊ केली आहे. उपमुख्यमंत्रीपदासह 13 अन्य मंत्रिपदं भाजपने शिवसेनेला देऊ केली आहेत. पण कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद दिलं जाणार नसल्याचं भाजपने स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहिल. तसेच 26 मंत्रिपदंदेखील भाजप स्वत:कडे ठेवणार आहे. गृह खातं, अर्थ खातं, नगरविकास आणि महसूल खातं शिवसेनेला न देता भाजप स्वत:कडे ठेवणार असल्याचं भाजपने स्पष्ट केलं आहे.

आज भाजपच्या सर्व नवनिर्वाचित आमदार आणि नेतेमंडळींनी विधीमंडळात एकत्र येत देवेंद्र फडणवीस यांची एकमताने गटनेतेपदी निवड केली. त्यामुळे येत्या काही दिवसात देवेंद्र फडणवीस सर्वात जास्त आमदार असलेल्या पक्षाचा नेता या नात्याने राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.

शिवसेना समसमान जागा वाटपाच्या फॉर्मुल्यावर ठाम आहे. तर भाजप मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगत आहे. तर आता भाजपने समोर केलेला हा प्रस्ताव शिवसेना मान्य करते का? हे पाहणं महत्वाचं आहे.