Home ताज्या बातम्या भाजपा जिल्हाध्यक्षपदी नितीन काळे

भाजपा जिल्हाध्यक्षपदी नितीन काळे

0

उस्मानाबाद , प्रतिनिधी : भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदी नितीन काळे यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वीही त्यांनी जिल्हाध्यक्षपद सांभाळले आहे. काळे यांच्या नावावर सर्वसंमतीने निर्णय झाल्याचे बोलले जात आहे.

भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी निवडणूक निरीक्षकासमोर आज शनिवारी (८ फेब्रुवारी) एकूण १५ जणांनी मुलाखती दिल्या. त्यात मावळते जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, सुधीर पाटील, नितीन काळे. संताजी चालुक्य, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, रामदास कोळगे आदींचा समावेश होता. प्रदेश कमिटीने नितीन काळे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून घोषणा केली.

मावळते जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांची तीन वर्षाची कारकीर्द एक वर्षांपूर्वी संपली होती. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे एक वर्षे मुदत वाढ मिळाली होती. आज जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर व तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील तसेच मराठवाडा संघटन मंत्री भाऊराव देशमुख, जिल्हा संघटनात्मक निवडणूक निर्णय अधिकारी नागनाथ आण्णा नीडवदे हे उपस्थित होते.