Home बातम्या व्यवसाय भाजप खासदाराची ऑनलाईन शॉपिंग, मोबाईलऐवजी पाठवले दगड

भाजप खासदाराची ऑनलाईन शॉपिंग, मोबाईलऐवजी पाठवले दगड

0

मुंबई : दिवाळीच्या सिजनमध्ये सगळीकडे शॉपिंगची धूम सुरू आहे. तसेच ऑनलाईन खरेदी करण्याच्या प्रमाणात गेल्या काही वर्षांपासून लक्षणीय वाढ झाली आहे. पण चिंतेची बाब म्हणजे ऑनलाइ खरेदीरम्यान होणाऱ्या फसवणुकीमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेकदा सर्वसामान्यांना ऑनलाईन खरेदीच्या वेळी वाईट अनुभव आल्याची उदाहरणं पाहत असतो. त्यातच आता अजून एका घटनेची भर पडली आहे. मुख्य म्हणजे ऑनलाईन खरेदीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अमेझॉन या साईटवरुन एका भाजप खासदारालाच चुना लावण्यात आला आहे.

Khagen Murmu असं नाव असणाऱ्या या मालदा उत्तर येथील खासदारांना सोमवारी एक धक्का बसला. ते जवळपास तीन वेळा आमदार राहिले आहेत. सध्याच्या घडीला ते खासदारकीचं पद भूषवत आहेत. त्यांनी दिवाळीच्या सवलींचा लाभ घेत 11 हजार 999 रुपयांचा मोबाईल फोन ऑर्डर केला होता. आपल्या एका नातेवाईकाला भेट देण्यासाठी म्हणून त्यांनी हा फोन ऑर्डर केला. ही खरेदी करत असताना त्यांनी पैसे देण्यासाठी ‘कॅश ऑन डिलीव्हरी’ हा पर्याय निवडला होता. रविवारी संध्याकाळी ही ऑर्डर त्यांच्यापर्यंत पोहोचली. यानंतर त्यांनी बॉक्स न खोलताच डिलीव्हरी बॉयच्या हाती पैसे दिले. सोमवारी सकाळी तो बॉक्स उघडताच कोणा एका वेगळ्याच कंपनीचा बॉक्स असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बरं हा प्रकार इथवर थांबला नाही. बॉक्स उघडताच त्यांना यात मोबाईलऐवजी दगड असल्याचं लक्षात आलं. तेव्हा मात्र त्यांना धक्काच बसला.

हा सर्व प्रकार अतिशय धक्कादायक असल्याचं Khagen Murmu म्हणाले. त्यांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. यापूर्वी आपण कधीही काहीच ऑनलाईन न मागवल्याचं त्यांनी सांगितली. या प्रकाराची माहिती आपण ग्राहक तक्रार निवारण आणि याच्याशी संबंधित खातं हाताळणाऱ्या केंद्रीय मंत्रीमहोदयांकडे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.