Home बातम्या राजकारण भाजप स्वबळावर लढल्यास १६० जागांवर विजयी होईल- गिरीश महाजन

भाजप स्वबळावर लढल्यास १६० जागांवर विजयी होईल- गिरीश महाजन

0

राज्यात विधानसभा निवडणुका या तोंडावर येवून ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी सवांद साधला ते यावेळी म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर लढल्यास पक्षाला १६० जागांवर विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

तसेच महाजन पुढे बोलताना म्हणाले, भाजपला स्वबळावर लढल्यास १६० जागांवर विजय मिळेल, मात्र, तरीही महायुतीकरून आम्ही निवडणूक लढवण्यास आमचे प्राधान्य देवू , असे ते म्हणाले . भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार महायुतीला विधानसभेच्या २८८ पैकी २२९ जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती निश्चित केली आहे. त्यावेळी जागावाटप आणि इतर बोलणी झाली होती. ज्या जागांबाबत शंका आहे, त्याची चर्चाही ठरल्यानुसार पार पडेल, असे महाजन यांनी सांगितले.

दरम्यान विधानसभा निवडणुकी आधीच निकालाबाबत भाजपने एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार भाजप महायुतीला 229 जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व्हेमुळे भाजपचे मनोबल वाढले आहे. तसेच या सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीतही भाजप – शिवसेना युती करूनच निवडणुकीला सामोरी जाणार असल्याचं दिसत आहे.