Home शहरे अहमदनगर भाजी विक्रेत्या महिलेला कोरोना, संपूर्ण गाव होम क्वारंटाईन

भाजी विक्रेत्या महिलेला कोरोना, संपूर्ण गाव होम क्वारंटाईन

अहमदनगर : शिर्डी जवळील निमगाव कोर्‍हाळे येथील एक भाजी विक्रेत्या 55 वर्षीय महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने राहाता तालुक्यात खळबळ उडाली. ही महिला भाजी विक्रेती असल्याने संपूर्ण गावाला होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तर, गावातील परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.

राहाता बाजार समितीत होलसेल भाजीपाला खरेदीसाठी ही महिला जात असल्याने सात दिवसांसाठी बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या 29 जणांना कोरोना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तर महिलेवर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

निमगाव कोर्‍हाळे येथील भाजी विक्रेत्या महिलेस गेल्या दोन तीन दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे तिला तपासणीसाठी 19 मे रोजी सावळीविहिर प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी दाखल करण्यात आले (Shirdi Vegetable Seller Woman). त्यानंतर साई संस्थानच्या रुग्णालयातही तिची तपासणी करण्यात आली होती. मात्र, या ठिकाणी तपासणीत कोरोना संशयित असल्याचे आढळून आल्याने त्या महिलेला नगर येथे पाठवण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात महिलेची तपासणी करण्यात आल्यानंतर घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. याचा अहवाल काल पॉझिटिव्ह आल्याने शिर्डी परिसरात खळबळ उडाली असुन प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे