Home शहरे अहमदनगर भानाहिवरा येथे महिला आर्थिक विकास महामंडळ हळदी कुंकू कार्यक्रम उस्हात साजरा

भानाहिवरा येथे महिला आर्थिक विकास महामंडळ हळदी कुंकू कार्यक्रम उस्हात साजरा

0

नगर: (प्रतिनीधी कमलेश नवले अहमदनगर)दि. 01-02-2020 रोजी भानस हिवरे ता.नेवासा जि. अहमदनगर या ठिकाणी महिला आर्थिक विकास महामंडळ अहमदनगर मार्गदर्शीत ज्ञानेश्वरी लोकसंचलीत साधन केंद्र भेंडा व ग्रामपंचायत कार्यालय भानसहिवरे यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटातील महिलांकरिता हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी गावच्या सरपंच श्रीमती. मीनाताई जोजार, उपसरपंच श्रीमती.भारतीताई वंजारे, महिला आर्थिक विकास महामंडळ अहमदनगर जिल्ह्यचे जिल्हा समन्वय अधिकारी मा.श्री. संजय गर्जे सर, सहायक जिल्हा समनव्य अधिकारी मा.श्री.सुनील पैठणे सर उपस्थित होते . याप्रसंगी जि.स.अ. मा.संजय गर्जे सर व सुनील पैठणे सर यांचे महिलांना मार्गदर्शन लाभले. सिंधुबाई वंजारे, रुकसाना सय्यद , आदी महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाप्रसंगी महिलांना वाण म्हणून त्यांचा कार्यालयामार्फत विमा काढण्यात आला. सदर कार्यक्रमामध्ये भारतीय संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले.सदर कार्यक्रमाकरिता 200 महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक श्री.मयूर कुलकर्णी सर यांनी केले. सूत्रसंचालन लेखापाल अश्विन माळी यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहयोगिनी श्रीमती.योगिनी पवार यांनी परिश्रम घेतले.