Home अश्रेणीबद्ध भारताच्या कर्णधाराने मोडला मेसीचा विक्रम; सर्वाधिक गोल क्रमवारीत सुनील छेत्री दुसऱ्या स्थानावर

भारताच्या कर्णधाराने मोडला मेसीचा विक्रम; सर्वाधिक गोल क्रमवारीत सुनील छेत्री दुसऱ्या स्थानावर

0
भारताच्या कर्णधाराने मोडला मेसीचा विक्रम; सर्वाधिक गोल क्रमवारीत सुनील छेत्री दुसऱ्या स्थानावर

दोहा: भारतीय फुटबॉल संगाचा कर्णधार सुनील छेत्रीने केलेल्या दोन गोलच्या मदतीने भारताने २०२२च्या फुटबॉल वर्ल्डकप आणि २०२३च्या आशिया कप पात्रताफेरीच्या ग्रुप ई मधील दुसऱ्या फेरीतील लढतीत बांगलादेशचा २-०ने पराभव केला. भारताच्या या विजयासह छेत्रीने अर्जेंटीनाचा दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेसीचा विक्रम मागे टाकला.

वाचा- भारताचा श्रीलंका दौरा: वनडे आणि टी-२० मालिकेचा कार्यक्रम जाहीर, सर्व अपडेट एका क्लिकवर

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात सुनील छेत्रीने ७९व्या मिनिटाला पहिला गोल करत भारतीय संघाचे खाते उघडले. त्यानंतर अखेरच्या काही मिनिटात (९०+२) सुनीलने आणखी गोल करत भारताचा ग्रुप ई मधील या सामन्यातील विजय निश्चित केला. या दोन गोलसह ३६ वर्षीय सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय स्तरावर गोलची संख्या ७४ इतकी केली. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सक्रिय असलेल्या खेळाडूंमध्ये ख्रिस्टियानो रोनाल्डो नंतर सर्वाधिक गोल करणाऱ्या फुटबॉलपटूंमध्ये छेत्रीचा क्रमांक लागतो. रोनाल्डोने १०३ गोल केले आहेत.

वाचा- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतक कोणत्या संघाच्या नावावर?

टॉप- १०मध्ये येण्यासाठी एक गोल हवा

फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या १० मध्ये येण्यासाठी सुनील छेत्रीला फक्त एका गोलची गरज आहे. या यादीत तो सध्या ११व्या स्थानावर आहे. त्याच्यापुढे १०व्या क्रमांकावर तीन खेळाडू आहेत. यात हंगेरीचा सेंडर कोक्सिस, जपानचा कुनिशिगे कामटो आणि कुवेतचा बशर अब्दुल्लाह हे खेळाडू आहेत. या सर्वांनी प्रत्येकी ७५ गोल केले आहेत.

वाचा- WTC फायनलच्या आधी न्यूझीलंडची ताकद वाढली; भारतीय संघाला दिला इशारा

सुनील छेत्रीच्या मागे असलेले युएईच्या अलीने गेल्या आठवड्यात मलेशियाविरुद्ध ७३वा गोल केला होता. तर मेसीने चिली विरुद्ध ७२वा गोल केला.

वाचा- तुमच्याकडे ओमान तर आमच्याकडे… ; पाहा टी-२० वर्ल्डकपसाठी BCCIचा प्लॅन बी!

स्पर्धेतील भारताचा पहिला विजय

याआधी तीन जून रोजी झालेल्या सामन्यात कतार विरुद्ध भारताचा ०-१ असा पराभव झाला होता. पण त्यानंतर बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने जोरदार कमबॅक केले. आता भारताची पुढील लढत १५ जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. बांगलादेशने अखेरच्या काही मिनिटात बरोबरी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. भारत २०२२च्या वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्याच्या शर्यतीतून आधीच बाहेर झाला आहे.

Source link