Home बातम्या ऐतिहासिक भारतीय औद्योगिक विकासाला गती देणारे व्यक्तिमत्व हरपले-जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची राहुल बजाज यांना आदरांजली

भारतीय औद्योगिक विकासाला गती देणारे व्यक्तिमत्व हरपले-जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची राहुल बजाज यांना आदरांजली

0
भारतीय औद्योगिक विकासाला गती देणारे व्यक्तिमत्व हरपले-जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची राहुल बजाज यांना आदरांजली

मुंबई, दि. 12 : बजाज उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष राहुल बजाज यांच्या निधनामुळे भारतीय औद्योगिक विकासाला गती देणारे व्यक्तिमत्त्व हरपले आहे अशा शोकभावना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज व्यक्त केल्या आहेत.

श्री. पाटील यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे की, भारतीय औद्योगिक विश्वाला विशेषतः ऑटो उद्योगाला स्वतंत्र ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि औरंगाबाद येथील उद्योग विश्वाची भरभराट करण्यात आणि या शहरांच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी विकसित केलेल्या अनेक वाहनांमुळे सामान्य माणसांच्या आशा आकांक्षां पूर्णत्वास गेल्या.

भारताला स्वयंचलित दुचाकी वाहन उद्योग क्षेत्राला नव्वदच्या दशकात स्वतंत्र ओळख मिळाली. यामध्ये राहुल बजाज यांच्या नेतृत्वाखालील बजाज कंपनीचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जमनालाल बजाज यांचा देश सेवेचा वारसा जपला. त्यांनी समाजातील दुर्बल वर्गासाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांना मदतीचा हात देऊन सामाजिक भान जोपासले, असे श्री. पाटील यांनी संदेशात नमूद केले आहे.

000