मागच्या काही काळापासून निखिल जैन आणि नुसरत जहां यांच्यात वाद सुरू असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. नुसरत मागच्या ६ महिन्यांपासून आपल्यासोबत नसल्याचं निखिलचं म्हणणं आाहे. तसेच दुसरीकडे जेव्हा नुसरत प्रेग्नन्ट असल्याचं वृत्त समोर आलं तेव्हा ‘याबाबत मला काहीच माहीत नाही आणि जरी ती प्रेग्नन्ट असेल तरीही ते मुलं माझं नाही.’ असं निखिल जैननं म्हटलं आहे.
नुसरतनं आता त्यांच्या लग्नाबाबत आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. ती म्हणाली, ‘परदेशात लग्न झाल्यानं आणि टर्की विवाह कायद्यानुसार ही लग्न अमान्य आहे. हे लग्न दोन वेगवेगळ्या धर्मातील व्यक्तींमध्ये झालं होतं. त्यामुळे भारतात याला कायदेशीर मान्यता मिळायला हवी होती मात्र असं झालं नाही.’
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘कायदेशीररित्या हे लग्न वैध नाही तसेच हे फक्त एक लिव्ह इन रिलेशनशिप होतं. त्यामुळे या लग्नात घटस्फोटाचा प्रश्नच येत नाही. आम्ही दोघंही खूप अगोदरच वेगळे झालो होतो मात्र मी यावर बोलणं टाळलं कारण मला माझं खासगी आयुष्य सार्वजनिक करायचं नव्हतं. हे लग्न कधीच कायदेशीर नव्हतं.’ एवढंच नाही तर नुसरतनं तिच्या सोशल मीडियावरील लग्नाचे सर्व फोटो डिलिट केले आहेत.
दरम्यान २०१९ मध्ये नुसरत जहां आणि निखिल जैन यांनी टर्कीमध्ये लग्न केलं होतं. या दोघांचा लग्नसोहळा मोठ्या धूमधडाक्यात पार पडला होता. त्यानंतर सोशल मीडियावरही या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण मागच्या सहा महिन्यांपासून या दोघांमध्ये वाद सुरू असल्याचं बोललं जात आहे. तसेच नुसरतचं अभिनेता यश दासगुप्ता याच्याशी अफेअर असल्याचं बोललं जात आहे. हे दोघं डिसेंबर २०२० मध्ये राजस्थान ट्रीपवरही गेले होतं. अर्थात यावर स्पष्टीकरण देत यशनं आम्ही दोघं फक्त प्रोफेशनल पार्टनर असल्याचं म्हटलं होतं.

























WhatsApp