भारतीय प्रजासत्ताकाचा ७५ वा वर्धापन दिनोत्सव; विभागीय आयुक्तालयात तिरंग्यास मानवंदना – महासंवाद

भारतीय प्रजासत्ताकाचा ७५ वा वर्धापन दिनोत्सव; विभागीय आयुक्तालयात तिरंग्यास मानवंदना – महासंवाद
- Advertisement -

भारतीय प्रजासत्ताकाचा ७५ वा वर्धापन दिनोत्सव; विभागीय आयुक्तालयात तिरंग्यास मानवंदना – महासंवाद

अमरावती, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताकाच्या 75 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज प्रभारी विभागीय आयुक्त सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी श्री. कटियार यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व राज्यगीतानंतर पोलीस पथकाव्दारे तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. यावेळी अपर आयुक्त गजेंद्र बावणे, उप आयुक्त रमेश आडे, राजीव फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार प्रज्ञा काकडे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

0000

- Advertisement -