Home शहरे मुंबई भारतीय मराठा संघाच्या वतीने कोपर्डी घटनेतील बघिणीस श्रद्धांजली अर्पण

भारतीय मराठा संघाच्या वतीने कोपर्डी घटनेतील बघिणीस श्रद्धांजली अर्पण

ठाणे : कोपर्डी घटनेला कित्येक वर्ष होऊन अद्यापही आरोपीला फाशीची शिक्षा झाली नाही. या घटनेला 13 जुलै रोजी तीन वर्ष झाली असल्याने भारतीय मराठा संघाच्या वतीने कळवा येथील कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी कार्यक्रम प्रसंगी संघाचे सरचिटणीस राजेंद्र पालांडे यांनी कोपर्डी येथे जी घटना घडली त्या घटनेतील आरोपीला सरकारने फाशीशी शिक्षा द्यावी तरच खर्‍या अर्थाने कोपर्डी येथील घटनेतील सरकारचे यश समजले जाईल असे कार्यक्रम प्रसंगी सांगितले. 
या श्रद्धांजली कार्यक्रम प्रसंगी सर्वानी कोपर्डी घटनेतील बघिणीच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले. यावेळी भारतीय मराठा संघ संस्थापक अध्यक्ष अविनाश पवार, सरचिटणीस राजेंद्र पालांडे, उपाध्यक्ष दिपक पालांडे, महिला उपाध्यक्षा अनघा जाधव, ठाणे-पालघर जिल्हा संपर्क प्रमुख सदाशिव गारगोटे, ठाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल कदम, सातारा जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव, ठाणे जिल्हा सहसचिव भगवान पार्टे, श्याम सावंत, तपस्या कश्यप तसेच मोठया संख्येने मराठा बंधू, बघिनी उपस्थित होते.