Home ताज्या बातम्या भारतीय शास्रीय संगीताच्या परिभाषा आता इंग्लिश मध्येही उपलब्ध-सूरायनच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात पुस्तकाचे प्रकाशन.

भारतीय शास्रीय संगीताच्या परिभाषा आता इंग्लिश मध्येही उपलब्ध-सूरायनच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात पुस्तकाचे प्रकाशन.

0

सूरायन क्लासिकल म्युझिक फाउंडेशनच्या वतीने रविवार दिनांक २७ ऑक्टोबर रोजी सुस रोड पाषाण येथे संत तुकाराम मंगल कार्यालय येथे दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले होते. यात पं.अरविंदकुमार आजाद यांचे शिष्य सौरभ गुळवणी यांनी एकल तबलावादन सादर केले.यात त्यांनी बनारस घराण्याच्या परंपरेनुसार ताल त्रितालमध्ये उठाण,औचार,कडा,रेला,गत,फर्द प्रस्तुत करत बहारदार वादन सादर केले.त्यांना देवेंद्र देशपांडे यांनी नगमा संगत केली.त्यानंतर डॉ.प्रियांका गुळवणी लिखित “सूरायन रेडी टू राईट आंसर गाईड बुक”या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध शास्रीय संगीत गायक पं.विजय कोपरकर यांच्या हस्ते झाले.या पुस्तकामुळे जे विद्यार्थी शास्रीय संगीताच्या परीक्षा इंग्रजी मधून देवू इच्छितात त्यांची खूप सोय झाली आहे.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पं.विजय कोपरकर यांच्या बहारदार गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग बसन्तमुखारी रागाने केली.त्यानंतर मियाँ की तोडी रागातील बंदिशी,नाटयगीते,सावरे अई जैयो इत्यादी सादर करीत त्यांनी रसिकांना स्वरधारांमध्ये चिंब भिजवले.त्यांना तबल्यावर पं.रामदास पळसुले व हार्मोनियम वर राहुल गोळे यांनी समर्पक साथ केली.कार्यक्रमाचे निवेदन रोहिणी गोरे यांनी केले.

छायाचित्र :डावीकडून पं.विजय कोपरकर,डॉ.प्रियांका गुळवणी,पं.रामदास पळसुले,राहुल गोळे.