Home ताज्या बातम्या भारत आणि चीनमध्ये तणाव वाढल्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण , काही मिनिटात बुडाले 34 हजार कोटी

भारत आणि चीनमध्ये तणाव वाढल्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण , काही मिनिटात बुडाले 34 हजार कोटी

नवी दिल्ली: मंगळवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात तेजीने झाली. मात्र आता भारत आणि चीनमधील तणाव वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर प्रमुख बेंचमार्क इंडेक्स सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली आहे. बीएसईच्या 30 शेअर्सचे प्रमुख बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स वरील स्तरापासून 600 अंकानी घसरून 33,241 च्या पातळीवर आला आहे. एनएसईच्या 50 शेअर्सचे प्रमुख इंडेक्स निफ्टी मध्ये वरील स्तरापासून 200 अंकांनी घसरण झाली आहे. मंगळवारी सेन्सेक्स 624.92 अंक वर तर निफ्टी 201.1 अंकांच्या वाढीसह बाजार सुरू झाला. त्यानंतर पुन्हा सेन्सेक्स 793.21 आणि निफ्टी 232.45 अंकांपर्यंत वाढला होता.

कोट्यवधी रुपये बुडाले

एसकोर्ट सिक्युरिटी रिसर्च हेड आसिफ इकबाल यांनी न्यूज 18 हिंदीशी बोलतना अशी माहिती दिली की, भारत आणि चीनमध्ये तणाव वाढल्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाली. ज्याठिकाणी सकाळी गुंतवणुकदारांना शेअर बाजारात मोठा फायदा मिळत होता. तेच या बातमीमुळे काही मिनीटांमध्ये गुंतवणूकदारांचे 34 हजार कोटी रुपये बुडाले आहेत.

सेन्सेक्स 200 अंकानी तर निफ्टी 60 अंकानी उतरला

बीएसईच्या (BSE) 30 शेअर्सचे प्रमुख बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स सध्या (दुपारी 1.40) 200 अंंकानी घसरून 33,086 च्या स्तरावर आला आहे. आणि एनएसईच्या (NSE) 50 शेअर्सचे बेंचमार्क निफ्टी 60 अंकांनी घसरून 9753 या स्तरावर आहेत.