पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सहभाग; तिरंगा यात्रेत हजारो लोकांची गर्दी
नागपूर दि. 16 : पाकिस्तान विरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या यशानंतर भारतीय लष्कराचे आभार आणि त्यांच्या सन्मानार्थ नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे महसूल मंत्री व नागपूर/अमरावती जिल्हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अध्यक्षतेखाली सिंदूर सन्मान ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली.
शहरातील जयस्तंभ चौक परिसरातून या तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून भारत माता की जय…वंदे मातरम…. अशा घोषणा देत यात्रेची सुरुवात करण्यात आली. यात्रेत सहभागी झालेल्या लोकांच्या हाती तिरंगा ध्वज होते. ही यात्रा शहरातील मोटर स्टेण्ड चौक–हैदरी चौक–कल्पना होटल चौक–चावड़ी चौक– मार्गाने नेताजी सुभाष चंद्र बोस चौक परिसरात पोहोचली, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करून देशाचे वीर शहीद सुपुत्रांना नमन करण्यात आले.
भारतमातेच्या रक्षणार्थ अहोरात्र आपले प्राण पणाला लावून लढणाऱ्या भारतीय सेनादलांतील सैनिकांना या यात्रेच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली. कामठीसह संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील अनेक नागरिक अतिशय उत्साहात यात्रेमध्ये सहभागी झाले होते. भारतीय सैन्याच्या या कामगिरीप्रती आपला अभिमान व्यक्त केला. यावेळी यात्रेत सहभागी माजी सैनिकांचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित लोकांना संबोधित केले.
या सन्मान यात्रेमध्ये डॉ. आशिष देशमुख, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आमदार सुधीर पारवे, माजी आमदार राजू पारवे, माजी सैनिक तसेच शेकडो नागरिक, कारकर्ते उपस्थित होते.