Home मनोरंजन भावना कमाल आहेच पण… बाबा झाल्यानंतर काय वाटतं? कलाकार झाले व्यक्त

भावना कमाल आहेच पण… बाबा झाल्यानंतर काय वाटतं? कलाकार झाले व्यक्त

0
भावना कमाल आहेच पण… बाबा झाल्यानंतर काय वाटतं? कलाकार झाले व्यक्त

[ad_1]

त्याचा नायक व्हायचंय
आधीच्या ‘फादर्स डे’ला मी माझ्या बाबांविषयी बोलायचो; पण आता मी स्वतः बाबा झालोय आणि मला स्वतःविषयी बोलायचं आहे, ही जाणीव कमाल आहे. ऋग्वेद हे आमचं जग आहे. बाबा म्हणून माझ्यावर नक्कीच खूप मोठी जबाबदारी आहे. मला माझ्या मुलासाठी त्याचा नायक व्हायचं आहे.
– शशांक केतकर


जबाबदारी वाढलीय
सध्या मी कामानिमित्त बाहेरगावी आहे. पण ‘फादर्स डे’ला मीराला भेटण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. जवळपास दोन महिन्यांनी आमची भेट होणार आहे. मी तिला पहिल्यांदा कडेवर घेतलं होतं तेव्हा ‘मी बाबा झालोय’ याची जाणीव झाली. जन्मापासूनच कोणीतरी माझं नाव लावणार आहे; ही जबाबदारी मोठी असल्याचं समजलं. आता कोणतीही गोष्ट करताना पहिला विचार येतो तो मीराचाच.
– सचिन देशपांडे


कमाल भावना
मला काही जणांचे फोन आले तेव्हा लक्षात आलं की आता यावर्षीपासून मी स्वतः वडील म्हणून ‘फादर्स डे’ साजरा करू शकतो. माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की आता मला माझा लेक अर्जुन यादिवशी शुभेच्छा देईल. तो माझ्याकडे बघून हसतो तेव्हा खूप भारी वाटतं. त्यामुळे या ‘फादर्स डे’ला मी बाबा झालोय याची पुन्हा एकदा जाणीव होणार आहे. हे सगळं इतकं कमाल आहे की नेमक्या शब्दांत व्यक्त करता येत नाहीय.
– आरोह वेलणकर


सुखद भावना
बाबा झालोय तर जबाबदारी निश्चितच वाढलीय. माझा पहिलाच फादर्स डे आहे, ही भावना आनंद देणारी आहे. लॉकडाउनमध्ये माझ्या लेकीबरोबर खूप वेळ घालवायला मिळतोय, ही एक चांगली गोष्ट आहे.
– निपुण धर्माधिकारी

जादूई गोष्ट
रूहानचा जन्म झाला तेव्हादेखील मी म्हणालो होतो की, आता कोणीतरी मला ‘फादर्स डे’ला शुभेच्छा देईल. आतापर्यंत यादिवशी मी माझ्या बाबांना शुभेच्छा दिल्या पण आता मला शुभेच्छा मिळणार आहेत. ही भावना खूप सुरेख आहे. कदाचित ही इतरांसाठी मोठी गोष्ट नसेल पण माझ्यासाठी ही जादूई गोष्ट नक्कीच आहे.
– श्रीकार पित्रे


संकलन: संपदा जोशी



[ad_2]

Source link