Home मनोरंजन भिंतीवर दादासाहेब फाळके, फिल्मफेअर अवॉर्ड मात्र घरात जेवणाची भ्रांत, लीलाधर सावंतांची परिस्थिती बिकट

भिंतीवर दादासाहेब फाळके, फिल्मफेअर अवॉर्ड मात्र घरात जेवणाची भ्रांत, लीलाधर सावंतांची परिस्थिती बिकट

0
भिंतीवर  दादासाहेब फाळके, फिल्मफेअर अवॉर्ड मात्र घरात जेवणाची भ्रांत, लीलाधर सावंतांची परिस्थिती बिकट

[ad_1]

हायलाइट्स:

  • दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित आहेत लीलाधर सावंत
  • एकुलत्या एक मुलाचं कर्करोगाने झालं आहे निधन
  • लीलाधर यांनी केलं ‘हत्या’, ‘११० डेज’, ‘दिवाना’ सारख्या १७७ चित्रपटांचं कला दिग्दर्शन

मुंबई– बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना एका विशिष्ट वयानंतर काम मिळणं बंद होतं. त्यात मागील वर्षी लागलेल्या लॉकडाउनने लोकांच्या हातातील कामदेखील गेलं. अशात अनेक कलाकारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. अनेक हिट चित्रपटांसाठी कला दिग्दर्शकाचं काम करणारे लीलाधर सावंत हे देखील अनेक अडचणींचा सामना करत आहेत. कधीकाळी लीलाधर यांना त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. परंतु, आता मात्र त्यांच्या घरात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लीलाधर यांच्या पत्नीने याबद्दल माहिती दिली.

‘त्या’ व्यक्तीसाठी ऐश्वर्यानं घेतला होता ४५ लाखांचं मंगळसुत्र बदलण्याचा निर्णय

वृत्तवाहिनीशी बोलताना लीलाधर यांच्या पत्नी पुष्पा यांनी म्हटलं, ‘ज्या कलाकारांनी लीलाधर यांच्यासोबत काम केलं आहे, मी त्या कलाकारांना विनंती करते की आम्हाला मदत करा. आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे.’ यापूर्वी लीलाधर यांना दोन वेळेस ब्रेन हॅमरेजचा अटॅक आला आहे. त्यासोबत दोन वेळेस त्यांची बायपास सर्जरीदेखील झाली आहे. लीलाधर यांच्या आजारपणात त्यांचे सगळे पैसे खर्च झाल्याचं पुष्पा यांनी सांगितलं. आता तर नेहमी हसत खेळत असणाऱ्या लीलाधर यांच्या मुखातून शब्दही निघत नसल्याचं पुष्पा म्हणाल्या.

पुष्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदाला ‘हत्या’ चित्रपटात काम मिळवून देण्यासाठी लीलाधर यांनी दिग्दर्शक कीर्ती कुमार यांच्यासोबत बोलणी केली होती. लीलाधर यांच्या एकुलत्या एक मुलाचं कर्करोगाने निधन झालं. लीलाधर यांनी ‘हत्या’, ‘११० डेज’, ‘दिवाना’, ‘हद कर दी आपने’ सारख्या १७७ चित्रपटांचं कला दिग्दर्शन केलं आहे. त्यांना दादासाहेब फाळके, फिल्मफेअर, माणिकचंदसारख्या पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे. लीलाधर यांचे पुरस्कार आजही त्यांच्या भिंतींची शोभा वाढवत आहेत. परंतु, ते स्वतः मात्र बिकट परिस्थितीत आहेत.

वनिता खरातनंतर ‘सैराट’ फेम तानाजी गळगुंडेचं न्यूड फोटोशूट

[ad_2]

Source link