Home शहरे पुणे भिंत कोसळून लोणावळ्यात आणखी एकाचा मृत्यू

भिंत कोसळून लोणावळ्यात आणखी एकाचा मृत्यू

0

पवना धरण परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून, कोथुर्णे नदीशेजारी दुग्धव्यावसायिक राम नढे यांचा म्हशीचा गोठा आहे. नदीचे पाणी गोठ्यात शिरले होते त्यामुळे गोठ्यातील जनावरे व नढे कुटुंबातील राम नढे, पत्नी, मुलगा छबन नढे व एक कामगार अडकले होते. पाण्यात वाढ होत राहिल्याने जनावरे पाण्यात अडकून पडले. कोथुर्णे ग्रामस्थ नढे व त्यांच्या कुटुंबियांना बाहेर काढले; परंतु गोठ्यातील जनावरे गोठ्यातचं अडकून राहिली होती. राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी तत्काळ ‘एनडीआरएफ’च्या जवानांना सूचना दिल्या. आज दुपारी पुन्हा शिवदुर्ग रेस्क्‍यू टीम, बजंरगदल व ग्रामस्थांच्या वतीने उर्वरित जनावरे काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. लोणावळा रेस्क्‍यू टीमने प्रयत्न केला, सर्व जनावरे बाहेर काढण्यात आली.

लोणावळा: लोणावळ्यातील भांगरवाडी येथील एका घराची भिंत कोसळून भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (दि. 5) पहाटे तीन वाजता ही घटना घडली. घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन दिवसांतील लोणावळ्यातील ही दुसरी घटना आहे. जयप्रकाश जगन्नाथ नायडू (वय 42, रा. भांगरवाडी, लोणावळा) असे घराच्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाल्याचे नाव आहे.

या घटनेबाबत जयप्रकाश यांचे बंधू विजय जगन्नाथ नायडू यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातील भांगरवाडी येथे नायडू रहात असलेल्या घराच्या भिंतीचा पडण्याचा आवाज पहाटे तीन वाजता ऐकला. जयप्रकाश यांनी काय प्रकार आहे, हे पहाण्यासाठी घराबाहेर पडले. त्यावेळी दरम्यान कोसळणाऱ्या भिंतीचा काही भाग जयप्रकाश यांच्या अंगावर आल्याने जयप्रकाश हे भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. त्याचवेळी त्यांचे बंधू विजय आणि कुटुंबातील सदस्यांनी तत्काळ आरडाओरडा केला.

आवाज ऐकून शेजारच्यांनी घटनास्थळी जाऊन जयप्रकाश यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले. उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी स्पष्ट केले. दरम्यान, रविवारी सकाळी साडेसात वाजता लोणावळ्यातील हनुमान टेकडी येथील झोपडपट्टीतील एक घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत कुणाल अजय दोडके या दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली सापडलेली व्यक्‍तीचा मृत्यू झाला.