Home शहरे मुंबई भिवंडीवर धोक्याचे सावट

भिवंडीवर धोक्याचे सावट

0
भिवंडीवर धोक्याचे सावट

[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, ठाणेः शहरात धोकादायक इमारतींचा प्रश्न आ वासून उभा असून शहरामध्ये एप्रिल अखेरपर्यंत तब्बल ५२८ अतिधोकादायक (सी १ प्रवर्ग) इमारती असल्याची माहिती समोर आली आहे. तर, इमारत रिकामी करून दुरुस्ती करणे ( सी २ ए) तसेच इमारत रिकामी न करता दुरुस्ती करण्याबरोबर (सी २ बी) इमारतीची किरकोळ दुरुस्ती (सी ३). या प्रवर्गातील इमारतींची संख्याही बऱ्यापैकी आहे. मात्र करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे धोकादायक इमारतीवरील कारवाईला ब्रेक लागलेला आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये कारवाई होऊ शकली नाही. आता मे मध्ये कारवाई केली जाईल, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये धोकादायक इमारतीचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिक जीव मुठीत धरून या इमारतींमध्ये राहत असून पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती कोसळण्याचा अधिक धोका संभावतो. शिवाय इमारतीचे प्लास्टर किंवा अन्य भाग कोसळण्याच्या घटना नियमित घडत असतात. त्यामुळे अशा इमारतींवर वेळीच कारवाई करण्याची गरज असली तरी अनेकदा कारवायांमध्ये पालिका प्रशासनाकडून चालढकल केली जाते. परिणामी एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येते. गेल्या वर्षी २१ सप्टेंबर रोजी जिलानी इमारत कोसळल्यानंतर भिवंडी महापालिका प्रशासनाने तत्काळ अतिधोकादायक, धोकादायक तसेच अनधिकृत बांधकामावर कारवाई केली होती. परंतु राजकीय वरदहस्तामुळे अनेकदा कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे. आजही भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणावर धोकादायक इमारती आहेत. भिवंडी महापालिका प्रशासनाने शहरातील अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींचे सर्वेक्षणदेखील केले आहे. त्यानुसार पालिकेच्या अहवालानुसार ३० एप्रिलपर्यंत भिवंडी शहरामध्ये अतिधोकादायक इमारतींची संख्या ५२८ असून सी २ ए प्रवर्गामध्ये ४३७, सी २ बी प्रवर्गामध्ये २२६ आणि सी ३ प्रवर्गातील इमारतींची संख्या २४ आहे. अशा एकूण इमारतींची संख्या एक हजार २००पेक्षा अधिक आहे.

सी १ प्रवर्गात मोडणाऱ्या सर्वाधिक २२७ अतिधोकादायक इमारती महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनच्या हद्दीमध्ये आहेत. प्रभाग क्रमांक एकमध्ये ८३, प्रभाग क्रमांक २ मध्ये २०, प्रभाग क्रमांक ४ मध्ये ९२ आणि प्रभाग क्रमांक पाचमध्ये १०६ अतिधोकादायक इमारती आहेत.

१२०५ इमारतींना नोटीस

महापालिकेकडून आतापर्यंत प्रभाग समिती क्रमांक एकमधील ९७, समिती क्रमांक दोनमधील १९४, तीनमधील ३५१, चारमधील २८२ आणि पाचमधील २८१ अशा एकूण १२०५ इमारतींना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. ४६७ इमारतींचा पंचनामा करण्यात आला आहे. नोटिशीच्या अनुषंगाने १५९ इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट प्राप्त झाले असून ७४ इमारतींना दुरुस्तीची परवानगी देण्यात आली आहे. २२ इमारतींचे स्ट्रक्चरल स्टॅबिलीटी प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे.

विद्युत, पाणी पुरवठा खंडित

आतापर्यंत ६५ इमारतींचा विद्युत तर १५४ इमारतींचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर ७७२ इमारती निर्मनुष्य करण्याविषयी पोलिस प्रशासनाला पत्र देण्यात आले असून यापैकी ३९ इमारती निर्मनुष्य करण्यात आलेल्या आहेत. तर २० इमारतींवर हातोडा मारण्यात आला आहे.

[ad_2]

Source link