भूषण कुमार टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांचा मुलगा आहे. अभिनेत्री आणि निर्माता दिव्या खोसला कुमार यांचे ते पती आहेत. भूषणवर बलात्काराचा गंभीर आरोप करणार्या मुलीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत दावा केला आहे की, काम देण्याच्या नावाखाली भूषण कुमारने २०१७ ते ऑगस्ट २०२० या कालावधीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिच्यावर बलात्कार केला.
फोटो, व्हिडिओ लीक करण्याची धमकी
इतकेच नाही तर मुलीने आपल्या तक्रारीत असेही म्हटले आहे की भूषण कुमारने तिला धमकी दिली की जर ती त्याच्या विरोधात गेली तर तिचे व्हिडिओ आणि फोटो लीक केले जातील.
वडिलांच्या हत्येनंतर सांभाळला टी-सीरिजचा व्यवसाय
वडील गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर काका कृष्णा कुमार यांच्यासमवेत भूषण कुमारने टी-सीरिजची जबाबदारी सांभाळली. २००१ मध्ये भूषण कुमारने ‘तुम बिन’ सिनेमाद्वारे निर्माता म्हणून काम सुरू केले. यानंतर त्याने आपल्या प्रोडक्शन हाऊसमधून एकामागून एक अनेक हिट फिल्म्स दिली. यामध्ये ‘भूलभुल्लैया’ ते ‘आशिकी २’, ‘बादशाहो’ ते ‘तुम्हारी सुलु’, ‘भारत’ ‘सत्यमेव जयते’ या सिनेमांचा समावेश आहे. देशात मीटू चळवळ सुरू असतानाही भूषण कुमारवरील आरोप चव्हाट्यावर आले होते. असं असलं तरी प्रत्येकवेळी भूषणने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.