भेंडी ८० रूपये किलो !

- Advertisement -

वणी : भाजीपाल्याचे दर काही अंशी कमी तर काही सर्वसामान्यांच्या आवाक्यात अशी स्थिती असली तरी भेंडीला येथील आठवडेबाजारात मंगळवारी ८० रूपये प्रती किलोचा दर मिळाला. मंगळवारी वणी शहराचा आठवडे बाजाराचा दिवस होता. वणी-पिंपळगाव रस्त्यावर भरणाऱ्या बाजाराचे स्वरु प मोठे असते. सुमारे शंभर गावांचा व्यावसायिक संबध विविध वस्तुंच्या खरेदी विक्र ी च्या माध्यमातून येतो. आठवडे बाजारात आठ दिवसांच्या वस्तु खरेदीचे नियोजन असते. त्यात भाजीपाला व विविध फळे घेण्याकडे स्थानिक गृहीणीचा कल असतो. विविध वस्तुनी आठवडे बाजार सजला असताना भेंडी चांगलाच भाव खाऊन गेली. २५ ते ३० रु पये किलो दराने मिळणाºया भेंडीचा भाव ८० रु पये प्रती किलोचा होता व इतर भाजीपाला स्वस्त होता. मर्यादीत विक्र ेते व अमर्यादीत खरेदीदार असे चित्र असले तरी भेंडीने आठवडे बाजारात भाव खाल्याचे दिसून आले.

- Advertisement -