Home गुन्हा भोसरीत तीन महिलांना मारहाण करत विनयभंग,संबंधित तरुणावर गुन्हा दाखल

भोसरीत तीन महिलांना मारहाण करत विनयभंग,संबंधित तरुणावर गुन्हा दाखल

0

पुणे : परवेज शेख भोसरीत तीन महिलांना मारहाण करत विनयभंग,संबंधित तरुणावर गुन्हा दाखल.भोसरी : एक महिला मंगळवारी दुपारी आपल्या मुलीसोबत त्यांच्या दुकानामध्ये होत्या. त्यावेळी आोरीपी जावेद तिथे आला. ‘मला हिच्यासोबत बोलायचे आहे’ असे म्हणत फिर्यादी महिला व त्यांच्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केले. मुलीला शिवीगाळ करून मारहाण केल्याचेही फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांची भाची आली असता आरोपीने तिच्याशीही गैरवर्तन करत तिघींचा विनयभंग केला. याबाबत तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना मंगळवारी (दि.5) दुपारी साडेचार वाजण्याचा सुमारास भोसरी येथे घडली.

जावेद लालसा नदाफ (वय 19) असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 33 वर्षीय महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याबाबत गुन्हा दाखल केला असून भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.