मंगळवारी प्रशिक्षक आणि समन्वयक पदाची थेट भरती

- Advertisement -

उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । २५ मे : कृषी क्षेत्रात करियर करण्यास इच्छुक तरूणांना चांगली संधी चालून आली आहे. उस्मानाबाद येथील आत्माचे (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) प्रकल्प संचालक यांचे कार्यालयात कृषी प्रशिक्षक आणि समन्वयकाच्या एकूण चाळीस जागांसाठी भरती आहे. मंगळवारी २६ मे रोजी यांसाठी इच्छुकांच्या मुलाखती आहेत.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत साल सन २० – २१ साठी कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्तविद्यमाणे शेतीशाळा हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशिक्षक चाळीस आणि समन्वयक तीन अशी पदे तात्पुरत्या स्वरुळात थेट मुलाखतीतून भरली जाणार आहेत. यातून मासिक वीस ते पंचवीस हजार रुपये कमावण्याची संधी आहे. हे काम ही रब्बी आणि खरीप दोन्ही पिकांसाठी असून जवळपास आठ महिने चालणारे आहे.

मागच्या वर्षीही ही पदे भरण्यासाठी सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कमी माणसावर कामाचा अधिक ताण पडला होता. यावर्षी मात्र सोशल मीडियातून या नोकर भरतीची प्रसिद्धी करण्यात आली आहे. त्यास आवश्यक प्रतिसाद मिळण्याची आशा आहे. असे संबंधित विभागाचे अजित गरड यांनी दूरध्वनीवरून सांगितले.

- Advertisement -