मंत्रालय येथे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक पार पडली

- Advertisement -

परवेज शेख शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय येथे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार जी, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे जी, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे जी उपस्थित होते.

पुणे महानगर परिसराच्या विकासासाठी असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करावे आणि विकास प्रकल्पांची कामे करताना महापालिकेच्या समन्वयातून त्याची अंमलबजावणी करावी तसेच शहराचे सौंदर्य देखील जपावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी यावेळी केल्या.

मेट्रोसाठी भूसंपादन, वर्तुळाकार बाह्य वळण रस्ता, पाणी पुरवठा योजना, विकास आराखडा, प्रादेशिक योजनांचा आराखडा, नगररचना योजना, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, परवडणारी घरे याबाबत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आढावा घेतला.

- Advertisement -