Home ताज्या बातम्या मंत्र्याचा फोन न उचलल्याने डॉक्टर निलंबित, सत्तेचा माज की फुकटचा रुबाब

मंत्र्याचा फोन न उचलल्याने डॉक्टर निलंबित, सत्तेचा माज की फुकटचा रुबाब

0

यवतमाळ : सत्ता ही माणसाला अंध बनविते म्हणतात ते खरच ! आता हेच पाहाना मंत्र्यांचा फोन न घेतल्याने डॉक्टरला थेट निलंबित करण्यात आलं. सत्तेच्या मस्तवालपनाचा हा प्रकार घडलाय यवतमाळ मध्ये. यवतमाळ जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा फोन न घेतल्याने शासकीय रुग्णालयातील एका निवासी डॉक्टर ला निलंबित करण्यात आले तर 3 कर्मचाऱ्यांना करणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.

वैद्यकीय पदव्युतर अभ्यासक्रमाला शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या डॉ. अच्युत नरोटे या विद्यार्थ्याची कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून अपघात कक्षात ड्युटी होती. त्यादरम्यान एकाच वेळी सहा रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांची त्यांच्यावर उपचार करताना तारांबळ सुरू होती. तेवढ्यात एका रुग्णासाठी राजकीय वशीला घेऊन आलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाने थेट जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना फोन लावला. उपचारात व्यस्त असलेल्या डॉक्टरला ‘तुमच्यासाठी भाऊंचा फोन आहे’ असे सांगितले. मात्र ‘फोनपेक्षा मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णावर उपचार करणे गरजेचे आहे. मी तुझ्या भाऊंसोबत दहा मिनिटांनंतर बोलतो अथवा शक्य असेल तर तुझ्या भाऊलाच येथे घेऊन ये’ असे उत्तर त्या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिले.

रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यातले हे संभाषण फोनवर असलेल्या भाऊने ऐकले. यानंतर कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला दुसऱ्या दिवशी थेट 8 दिवसासाठी निलंबन करण्यात आल्याचे पत्रच मिळाले. हा प्रकार पाहून या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याला जबर धक्का बसला. कुठलाही दोष नसताना केवळ फोन घेतला नाही म्हणून इतकी मोठी शिक्षा का ? असा प्रश्न त्याने आपल्या वरिष्ठांपुढे उपस्थित केला. या संदर्भात मार्ड संघटनेने अधिष्ठाता यांना निवेदन देऊन कारवाई मागे घेण्याची मागणी केली. तर लोकप्रतिनिधी चा अवमान केला म्हणून आणी या पुढे अश्या घटना टाळण्यासाठी त्याच्या वर कारवाई करण्यात आल्याचे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ मिलिंद कांबळे यांनी सांगितले..