हायलाइट्स:
- सालतोर मतदारसंघातून चंदना बाऊरी यांचा विजय
- चंदना बाऊरी या भाजपच्या विजयी उमेदवार
- तृणमूल काँग्रेसच्या संदीप मंडल यांचा केला पराभव
सालतोरा मतदारसंघात गेल्या दोन वेळेस तृणमूल काँगेसचे स्वपन बारुई यांनी विजय मिळवला होता. यंदा तृणमूलनं संतोष मंडल यांना या मतदारसंघात संधी दिली होती. या विजयानंतर चंदना बाऊरी यांच्यावर शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होतोय.
वाचा :विधानसभा निवडणूक २०२१ : कोण जिंकलं? कोण पराभूत? चर्चित चेहरे
३० वर्षीय चंदना या अत्यंत सामान्य कुटुंबाशी निगडीत आहेत. संपत्तीच्या नावावर त्यांच्याकडे केवळ एक झोपडी आणि काही पैसे आहेत. चंदना यांना तीन मुलं आहेत. निवडणुकीच्या शपथपत्रात केलेल्या उल्लेखानुसार, चंदना यांच्याकडे केवळ ३१,९८५ रुपयांची संपत्ती आहे. तर त्यांच्या पतीकडे ३०,३११ रुपयांची संपत्ती आहे. त्याचे पती राज हे मिस्त्री म्हणून काम करतात. या दाम्पत्याकडे तीन बकऱ्या आणि तीन गायी आहेत. चंदना यांच्या घरात शौचालयदेखील नाही. परंतु, आपल्या पक्षाच्या प्रती इतक्या समर्पित आहेत की निवडणूक काळात कमळाची प्रिंट असलेली भगव्या रंगाची साडी परिधान करून त्या दररोज प्रचारासाठी फिरताना दिसल्या.
तिकिटांची घोषणा होईपर्यंत मला हेदेखील माहीत नव्हतं की मलाही उमेदवारी मिळणार आहे. परंतु, अनेक लोकांनी मला उमेदवारी अर्ज ऑनलाईन दाखल करण्यासाठी मला प्रोत्साहन दिलं. त्यानंतर मी निवडून येईल हे मला निश्चित सांगता आलं नसतं, अशी प्रतिक्रिया चंदना यांनी एएनआयशी बोलताना व्यक्त केली.