Home ताज्या बातम्या मजूर, गरजू व बेघरांसाठी हडपसर मतदारसंघात ‘कम्युनिटी किचन’

मजूर, गरजू व बेघरांसाठी हडपसर मतदारसंघात ‘कम्युनिटी किचन’

0

हडपसर :लाॅकडाउनमुळे हडपसर विधानसभा मतदारसंघातील कोणी उपाशी राहू नये याची काळजी घेत आमदार चेतन तुपे स्थानिकांसह परराज्यातील अडकलेल्या कुटुंबांना कार्यकर्त्यांमार्फत मदत पोचविण्याचे काम करीत आहेत. हजारांवर कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले,असून मतदारसंघातील हडपसर आणि कोंढवा येथे आता ‘कम्युनिटी किचन’ सुरू करण्यात आले आहे. लवकरच तिसरेही सुरू होत असून मागणीनुसार हा मदतीचा महायज्ञ सुरूच आहे.

कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाउन घोषित केले. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही. जिल्हा बंदीमुळे स्थलांतरीत मजूर राज्यात व ठिकठिकाणी अडकले. जवळ पैसे नाहीत, त्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्र्न निर्माण झाल्याने आमदार चेतन तुपे यांनी गरजूंना मदत पोचविण्यासाठी ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांची फळी कामाला लावली सुरवातीला सुके धान्य वाटप करण्यात आले .

प्रसंगी प्रशासनामार्फतही मदत पोचविली जात आहे.मात्र नुसते धान्य देऊन उपयोग होत नाही तर रोजच्या जेवणाची आवश्यकता असल्याचे लक्षात आल्यानंतर हडपसर येथे कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले. त्यांनतर कोंढवा येथे दुसरे किचन सुरू करण्यात आले आहे. गरजेनुसार रोज जेवण पुरवले जात आहे. मतदारसंघातील प्रभागातील नगरसेवकांकडून नागरिकांनाही मदत पोचविण्याचे कार्य सुरू आहे. मदतीचा हा महायज्ञ सुरूच राहणार असून काही कारणास्तव अनेकदा मदत पोचविण्यास थोडा विलंब होत आहे. तरी, नागरिकांनी संयम बाळगून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार चेतन तुपे यांनी केले आहे.

येथील अण्णासाहेब मगर रुग्णालय, महंमदवाडी येथील भानगिरे आणि कात्रज- कोंढव्यातील पालिकेच्या रुग्णालयात आवश्यक साहित्य तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच येथील दोन खासगी रुग्णालयातही कोरोनाच्या रुग्णांना सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असे आमदार चेतन तुपे यांनी सांगितले.

मदत कार्यात प्रशासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्था, त्या त्या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी, पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मित्र परिवार यांचे मोठे योगदान आहे. विशेष म्हणजे मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असलो तरी मदत देताना समोरचे गरजू कोणत्या पक्षाचे किंवा कोणत्या जाती धर्माचे आहेत. हे न पाहता ते माझ्या मतदसंघातील असल्याने तसेच आजची त्यांची अडचण पाहता ही सर्व माणसे माझीच समजून मदतीचा हात पुढे करत आहे.महाराष्ट्र शासन, खासदार डॉ. अमोल कोल्हे ,नगरसेवक, विविध पक्षाचे पदाधिकारी आणि सर्वांच्या सहकार्यातून हडपसर व कोंढवा येथे
‘कम्युनिटी किचन’ सुरू करण्यात आले आहे.मतदारसंघातील सुमारे दहा हजार कुटुंबापर्यंत हे जेवण पोहचविण्याचे नियोजन केले आहे.