Home गुन्हा मध्यप्रदेशमधून गावठी कट्टे आणून नाशिकसह परिसरात विक्री करणाऱ्या दोन सराईतांना जेरबंद

मध्यप्रदेशमधून गावठी कट्टे आणून नाशिकसह परिसरात विक्री करणाऱ्या दोन सराईतांना जेरबंद

0

परवेज शेख मध्यप्रदेशमधून गावठी कट्टे आणून नाशिकसह परिसरात विक्री करणाऱ्या दोन सराईतांना बेड्या.नाशिक:मध्यप्रदेशमधून गावठी कट्टे आणून नाशिकसह परिसरात विक्री करणाऱ्या दोन सराईतांना बेड्या ठोकण्यात गुन्हेशाखा युनिट एकच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यश आले आहे. काल(दि.२६) दुपारी रोकडोबा वाडी परिसरात रचलेल्या सापळ्यात दोन्ही संशयित जेरबंद झाले. दोघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.

अधिक माहिती अशी की, पोलीस हवालदार ऐवजी महाले यांना गुप्त बातमीदाराकडून बेकायदेशी पिस्तोल विक्री होणार असल्याचे समजले. महाले यांनी याबाबत माहिती पोलीस निरीक्षक आनंद वाघ यांन दिली. त्यानंतर काल दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सापळा रचला. दरम्यान, `सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास दोन संशयित बोलत उभे होते. त्यानंतर संशय आल्याने त्यांना पोलिसांनी घेराव घालून शिताफीने ताब्यात घेतले.

राहुल संदीप सोनवणे(वय २७, फ्लट क्रमांक ५, स्वप्नील सोसायटी जय भवानी रोड), व वतन ब्रह्मानंद वाघमारे वय ३१, रा. फ्लट नंबर ११, माधव पार्क) अशी या संशयितांची नावे आहेत. दोन्ही संशयितांची झाडाझडती घेतल्यानंतर कंबरेला पिस्तोल आढळून आले. विश्वासात घेतल्यानंतर अन्य पिस्तोल घरी असलायचे त्यांनी सांगितले.त्यानंतर त्याच्या घरी तपासणी केल्यानंतर पोलिसांना एकूण ४ गावठी पिस्तोल, ८ जिवंत काडतुसे, दोन मोबाईल, असा एकूण १ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रवींद्र बागुल करीत आहेत.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक बलराम पालकर, पोलीस हवालदार रवींद्र बागुल, संजय मुळक, प्रवीण कोकाटे, पोलीस नाईक विशाल काठे, विशाल देवरे, गणेश वडजे, चालक नाजीम पठाण यांच्या टीमने सापळा यशस्वी केला.

दोन्ही संशयित सराईत

संशयित राहुल पाटील हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर दोन दरोड्याचे गुन्हे, दाराद्याची तयारीचा एक गुन्हा, जबरी चोरीचा एक गुन्हा, घरफोडी १०, चोरी २ असे गंभीर स्वरूपाचे १८ गुन्हे दाखल आहेत.

मध्यप्रदेशातून येतात कट्टे

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेजवळ एका गावातून हे कट्टे विक्री होत असलायचे समोर आले आहे. दरम्यान, पुरवठा करणाऱ्यांच्या गावातील साखळीची उकल लवकरच होणार आहे. तसेच मध्यप्रदेशातील उम्रठी गावातील संश्यीतांचाही शोध सुरु असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.