भोपाळ:
मध्य प्रदेशमध्ये एका विवाहित आदिवासी महिलेवर तीन नराधमांनी चालत्या ट्रकमध्ये बलात्कार केला आहे. या प्रकरणी तिनही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
भोपाळमध्ये एक महिला आपल्या पतीसह आपल्या गावात परत जात होती. तेव्हा त्यांनी एका ट्रक चालकाकडे लिफ्ट मागितली. ट्रकमध्ये बिट्टू आणि आकाश हे दोघे आधीच उपस्थित होते. शुभम हा ट्रक चालवत होता. बिट्टू आणि आकाश यांनी महिलेची छेड काढण्यास सुरूवात केली. या छेडछाडीला जेव्हा पती आणि पत्नीने विरोध केला तेव्हा बिट्टू आणि आकाशने पतीला गाडी बाहेर फेकले. नंतर तिघांनी आळीपाळीने महिलेवर बलात्कार केला.
त्यानंतर नराधमांनी तिला मध्ये रस्त्यातच सोडून पळ काढला. महिलेने जखमी अवस्थेत घर गाठले आणि सासरच्यांना सर्व परिस्थिती सांगितली. सासरच्यांनी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी तिनही नराधमांना शोधून त्यांची रवानगी कोठडीत केली