Home शहरे मुंबई मनसुख हिरन हत्या प्रकरण : सुनील माने यांना १३ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी

मनसुख हिरन हत्या प्रकरण : सुनील माने यांना १३ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी

0
मनसुख हिरन हत्या प्रकरण : सुनील माने यांना १३ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी

[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अॅन्टेलिया या निवासस्थानाजवळच्या एका गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी अटकेत असलेले निलंबित पोलिस निरीक्षक सुनील माने यांना १३ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांची एनआयए कोठडी रविवारी संपली.

गाडीत स्फोटके ठेवल्यानंतर या गाडीचे मालक मनसुख हिरन यांची हत्या करण्याचा माने यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे यांचे माने हे अत्यंत जवळचे आहेत. वाझे यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी हिरन यांच्याकडून ही गाडी चोरली, त्याचा गैरवापर केला व त्यानंतर हिरन यांची हत्या करण्यासाठी वाझे यांना मदत केली, या आरोपाखाली माने यांना गेल्या महिन्यात अटक झाली होती. त्यानंतर विशेष एनआयए न्यायालयाने दिलेली कोठडी रविवार, १ मे रोजी संपली.

या प्रकरणी एनआयएने सुनील माने यांना न्यायालयासमोर हजर केले. ‘माने हे पोलिस अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांची तुरुंगात विशेष काळजी घेतली जावी’, अशी मागणी त्यांचे वकील आदित्य गोरे यांनी केली. ‘मानेंच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचला’, असे निर्देश न्यायाधीश राहुल भोसले यांनी तुरुंग प्रशासनाला दिले. यानंतर माने यांना न्यायिक कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे व रियाझ काझी हे दोघेही सध्या न्यायिक कोठडीतच आहेत.

[ad_2]

Source link