मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या

- Advertisement -

जळगाव : शहरातील कासमवाडी परिसरात मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याची अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली आहे. रविवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास ही घटना उजेडात आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. श्याम दीक्षित (वय-35, रा. पंचमुखी हनुमान मंदिर, लक्ष्मीनगर, जळगाव) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी (25 ऑगस्ट) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास श्याम दीक्षित यांचा मृतदेह कासमवाडी परिसरातील साईबाबा मंदिराच्या प्रांगणात आढळून आला. काही नागरिकांनी श्याम दीक्षित यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहिलं आणि त्यानंतर त्याची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकही तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. श्याम दीक्षित हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगावमधील माजी पदाधिकारी होते. त्यांनी जळगाव शहर मनसे उपाध्यक्षपद सांभाळलं होतं. श्याम दीक्षित यांच्या मृत्यू मागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. मात्र, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

- Advertisement -