Home अश्रेणीबद्ध मनसेतर्फे हडपसर विधानसभा मतदारसंघातील आमदाराच्या घोटाळा फायलींचे महापूजा

मनसेतर्फे हडपसर विधानसभा मतदारसंघातील आमदाराच्या घोटाळा फायलींचे महापूजा

0

मनसेतर्फे हडपसर विधानसभा मतदारसंघातील आमदाराच्या घोटाळा फायलींचे महापूजा

भूषण गरुड, पुणे
पुणे मनसे नगरसेवक वसंत (तात्या) मोरे यांच्या संकल्पनेतून हडपसर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार योगेश (अण्णा) टिळेकर यांच्या घोटाळ्यांच्या फायलींचे महापूजनाचा कार्यक्रमाचे आयोजन कोंढवा बुद्रुक याठिकाणी करण्यात आले.

आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नगरसेवक वसंत (तात्या) मोरे यांनी हडपसर विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार योगेश (अण्णा) टिळेकर यांच्यावर “भ्रष्टाचाराचा बकासूर” असे गंभीर स्वरूपाचे आरोप करत त्यांनी केलेल्या घोटाळ्यांरुपी फाईल शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2019 रोजी प्रतिभाताई पवार शाळेजवळ,कोंढवा बुद्रुक याठिकाणी जनतेच्या दरबारात प्रदर्शित करत घोटाळ्यांरुपी फायलींचे महापूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या मतदारसंघातील आमदार कोण कोणत्या घोटाळ्याच्या प्रकरणात लुप्त आहेत. याचे कोंढवा बुद्रुक येथील नागरिकांच्या निदर्शनास आणून देत. आमदार योगेश (अण्णा) टिळेकर हे हडपसर विधानसभाच्या आमदारकीसाठी पुन्हा इच्छुक असल्याने, अशा “भ्रष्टाचार लुप्त आमदारांला जनतेने मते का ? द्यावेत,” असे आव्हान मनसे नगरसेवक वसंत (तात्या) मोरे यांनी कोंढवा बुद्रुक येथील जनतेला केले.

घोटाळ्याच्या फाईली

  • आमदारावर गुन्हा दाखल करणाऱ्या कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली
  • 50 लाखाची खंडणी मागणाऱ्या आमदारावर गुन्हा
  • आमदार योगेश टिळेकर यांनी आरक्षणासाठी घेतली चार चाकी
  • हजारो कोटी चा मांजरी बांधकाम घोटाळा
  • येवलेवाडी डीपी महाघोटाळा 2018
  • मर्सडीज बेंजकार घोटाळा
  • भूमी ग्रीन एनर्जी वडगाव बुद्रुक घोटाळा
  • आमदार निधीतून झालेल्या विकास कामांचा घोटाळा सन 2014 ते 2018
  • हडपसर एमआयडीसी जागा घोटाळा
  • भूमी ग्रीन एनर्जी रामटेकडी घोटाळा
  • उड्डाणपुलामुळे प्राण्यांच्या स्थलांतराची वेळ
  • बांधकाम व्यावसायिकांचे पिळवणूक प्रकरण
  • हडपसर विधानसभा मतदार संघातील उडान पुलाच्या बाबतीत खोटारडेपणा
  • महा टेंडर घोटाळा
  • येवलेवाडी डीपी संदर्भात लाचलुचपत विभागाकडे तक्रार प्रकरण
  • मांजरी बांधकाम हजारो कोटीचा महाघोटाळा
  • पोलिस कर्मचारी जागा हडप करणे प्रकरण
  • राजीव गांधी उड्डाणपूल बोगस एनओसी प्रकरण
  • आमदारांच्या समर्थनात एफ.बी पोस्ट टाकून केलेली बदनामी प्रकरण
  • आमदार निधीतून झालेल्या कामांचा घोटाळा
  • MH.12.LN.0078, MH.12.PR.0078, MH.12.NC.0078 कार घोटाळे.

अशा घोटाळ्यांच्या फाईलचे महापुजन कोंढवा बुद्रुक जनतेच्या दरबारात करत घोटाळ्यांचे फायलीं प्रदर्शित करण्यात आले. यातील काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.

सदर कार्यक्रमा वेळी,
मनसे नगरसेवक वसंत (तात्या) मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर, अमित (अण्णा) जगताप, नितीन शेलार, योगेश खरे, मंगेश रासकर, समीर शिंदे, गोवर्धन गाडेकर, अमोल सारस, सतीश शिंदे, जयवंत गिरी, प्रशांत मोरे, उमेश धाडेकर उपस्थित होते.