Home ताज्या बातम्या ‘मन की बात’ मध्ये ‘पाणी’, ‘आयुष्य’ आणि ‘विजय’ याबद्दल PM मोदींनी दिला मंत्र ; मोदींनी सांगितलेले १० महत्वाचे मुद्दे

‘मन की बात’ मध्ये ‘पाणी’, ‘आयुष्य’ आणि ‘विजय’ याबद्दल PM मोदींनी दिला मंत्र ; मोदींनी सांगितलेले १० महत्वाचे मुद्दे

नवी दिल्‍ली :  दुसर्‍यांदा केंद्रात सत्‍ता स्थापन केल्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून संबोतिध केले. जल संरक्षण, झालेली लोकसभा निवडणुक आणि इतर अन्य विषयावर त्यांनी विचार मांडले. जल संरक्षणाच्या मुद्दावर मोदींनी विशेष जोर दिला. योग दिन साजरा केल्यानंतर जगभरातून सकारात्मक प्रतिक्रिया देखील मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

PM नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ मध्ये मांडलेले 10 महत्वाचे मुद्दे :-

जल संरक्षणावर भर

१) PM नरेंद्र मोदी म्हणाले, स्वच्छतेसाठी भारतीयांनी ज्या प्रमाणे जन आंदोलन केले त्याचप्रमाणे जल संरक्षणासाठी भारतीयांनी आंदोलन सुरू केले पाहिजे.

२) आपल्या देशात गेल्या अनेक वर्षापासुन जल संरक्षणासाठी वेगवेगळया पध्दतींचा वापर केला जातो, त्याच पध्दतीचा अवलंब करून पाण्याचे संरक्षण करावे तसेच त्या पध्दतीबाबत इतरांना सांगावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.

३) जल संरक्षणासाठी महत्वाचे योगदान देणार्‍या व्यक्‍तीचे, स्वंयसेवी संस्थांचे आणि इतर क्षेत्रात काम करणार्‍यांची माहिती याबरोबर शेअर करावी जेणे करून सर्वांची माहिती संग्रहित करण्यास मदत होईल आणि एक डाटाबेस तयार होईल असेही मोदी म्हणाले.

‘योगा-डे’ बाबत

४) पंतप्रधान मोदींनी योगा-डे साठी दिलेल्या योगदानाबद्दल सर्वांचे आभार मानले तसेच त्यांनी 21 जून रोजी पुन्हा एकदा मोठया उत्साहात योगा-डे साजरा करण्याचे आवाहन केले. त्यामध्ये एका कुटूंबातील 3-4 पिढींनी एकत्र येवुन योगा-डे साजरा करावा असेही ते म्हणाले.

५) भारतातील सर्वजण गर्वाने सांगु शकतात की, आमच्यावर कायद्याच्या नियमापेक्षाही लोकशाहीचे संस्कार आहेत. लोकशाही आमची संस्कृती आहे, लोकशाहीच आमची विरासत असून ती घेवुनच आम्ही मोठे झालो. लोकशाहीच्या कमतरतेची उणीव सर्वांनी आणीबाणीमध्ये अनुभवली. त्यामुळेच देशातील निवडणुका कोणाच्या हितासाठी नव्हे तर लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठीच असतात.

६) पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ज्यावेळी देशातील आणीबाणी लागु करण्यात आली होती त्यावेळी केवळ राजकीय विरोधकच विरोध करत नव्हते तर सर्वसामान्य जनतेच्या मनात देखील आक्रोश होता. हरविलेल्या लोकशाहीबद्दल तळमळ होती. त्यावेळी रात्र-दिवस जेवण न मिळालेल्यांना भुकेची जाणीव असते. आणीबाणीच्या काळात सर्वांनाच त्यांचे स्वातंत्र्य काढुन घेतल्यासारखे वाटत होते.

हाच लोकशाहीचा ‘सन्मान’

७) पंतप्रधान मोदी म्हणाले, बर्‍याच दिवसानंतर तुमच्या समोर मन की बात, जन-जन की बात, जन-मन की बात चा सिलसिला पुन्हा सुरू होत आहे. निवडणुकीच्या दरम्यान प्रचंड धावपळ होती मात्र मन की बात ची मजा हरवली होती. मत की बात ची उणीव जाणवत होती. आपण 130 कोटी भारतीयांच्या रूपात गप्पा मारत होतो.

८) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना वाचनासाठी काही वेळ देण्याचे आवाहन केले आहे. नरेंद्र मोदी मोबाईल अ‍ॅप वर वाचल्या जाणार्‍या पुस्तकांबाबत चर्चा करण्यास त्यांनी सांगितले.

९) अरूणाचल प्रदेशामध्ये एका अवघड ठिकाणी केवळ एका महिला मतदारासाठी पोलिंग बुथ निर्माण करण्यात आले होते. निवडणुक आयोगाच्या अधिकार्‍यांना त्या पोलिंग बुथवर पोहचण्यासाठी दोन-दोन दिवस लागत होते. हा सर्वांनाच आर्श्‍चयाचा धक्‍का असेल मात्र हाच तर खरा लोकशाहीचा सन्मान आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

१०) पंतप्रधान मोदी म्हणाले, योग क्षेत्रात मोठे योगदान देणार्‍यांसाठी ‘Prime Minister’s Awards’ ची घोषणा ही सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे. हा पुरस्कार जगभरातील अनेक संघटनांना देण्यात आला आहे.