Home ताज्या बातम्या मन, मेंदू आणि डोळ्याचा एकत्रित अविष्कार म्हणजे कला होय- प्रा. मंगेश हिरवे

मन, मेंदू आणि डोळ्याचा एकत्रित अविष्कार म्हणजे कला होय- प्रा. मंगेश हिरवे

0

माण खटाव : डॉ विनोद खाडे
दहिवडी काॅलेजमध्ये विद्यार्थी कौशल्य कार्यशाळा संपन्न
आजच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी अष्टपैलू विद्यार्थी घडवणे गरजेचे असून त्यासाठी विद्यार्थ्याच्या अंगी असलेल्या कौशल्याचा विकास होण्यासाठी कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन केले आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे मत प्राचार्य बी.टी. जाधव यांनी दहिवडी काॅलेज दहिवडी येथे ज्युनिअर वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या एकदिवसीय कार्यशाळेत यक्त केले सदर कार्यशाळेसाठी प्रमुख प्रशिक्षक म्हणून प्रा. मंगेश हिरवे श्रीपतराव पाटील विद्यालय व ज्युनियर काॅलेज करंजपेठ, सातारा यांना निमंत्रित केले होते. या कार्यक्रमासाठी सौ. आराधना जगदाळे, सौ. शलाका सुभेदार, डाॅ. बी.एस. बळवंत, प्रा.माने टी.एस., प्रा. मस्के व्ही.एस. सौ. मीनाक्षी महाजन, प्रा.मनिषा जवळ, प्रा.कांचन सोनवणे, कु. रुपाली खरात उपस्थित होते.


प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी एक तरी कौशल्य असतेच. त्याचा योग्य वेळी शोध घेऊन विकास केल्यास भावी कलावंत उदयास येतात म्हणूनच या कार्यशाळेचे आयोजन केले असून केशभूषा व वेशभूषा, रांगोळी काढणे, मेहंदी काढणे, सॅलड व फ्लावर अरेंजमेंट, पाककला, राखी, आकाश कंदील, गणपती, मेणबत्ती व साबण बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेतून भावी उद्योजक घडावेत असा आशावाद व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जवळ एम.जी., पाहुण्यांचा परिचय प्रा. मस्के व्ही.एस. , आभार प्रदर्शन प्रा. नरळे बी.एन., सूत्रसंचालन प्रा. बोराटे पी.बी. व प्रा. शेडगे वाय.एम. यांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. गुजले डी.पी., प्रा. कदम के.एम., प्रा. ढवाण व्ही. पी., कु.साक्षी चिरमे, कु. चैताली गलंडे, शंभूराज शिंदे, मयुरी सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.