Home ताज्या बातम्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण – महासंवाद

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण – महासंवाद

0
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण – महासंवाद

नांदेड, (जिमाका)दि. 16 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 74  व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार 17 सप्टेंबर 2022 रोजी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहन समारंभ होणार आहे. माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे सकाळी 8.30 वा. हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पण केले जाईल. यानंतर  सकाळी  9 वाजता राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होईल.  या समारंभास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे.

समारंभासाठी निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टिने बॅग किंवा तत्सम वस्तू सोबत आणू नयेत.  या मुख्य शासकीय समारंभास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालये, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पुर्वी किंवा 9.30 नंतर आयोजित करावेत असे स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रध्वज संहितेनुसार ध्वजवंदन करण्यात यावे. तसेच राष्ट्रध्वजाच्या उचीत सन्मानाबाबतचे गृह विभागाच्या परिपत्रकानुसार प्लास्टिकचे ध्वज वापरले जाऊ नयेत. यासाठी सर्वच यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना व आदेश दिले आहेत.

0000