Home शहरे अकोला मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी मंत्रिमंडळाची नवीन उपसमिती

मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी मंत्रिमंडळाची नवीन उपसमिती

0
मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी मंत्रिमंडळाची नवीन उपसमिती

मुंबई, दि. १४ : मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करण्याकरिता मराठवाड्यातील सर्व मंत्र्यांचा समावेश असलेली नवीन मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.

या समितीत रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपानराव भुमरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे हे असतील. औरंगाबादचे विभागीय आयुक्त हे या समितीचे सदस्य सचिव असतील. ही समिती १७ सप्टेंबर २०२३ पर्यंत मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम निश्चित करतील. तसेच यासाठी येणारा सुधारित खर्चाचा आराखडाही सादर करतील.

—–०—–