मराठा आरक्षणावरून राडा; साताऱ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक

मराठा आरक्षणावरून राडा; साताऱ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक
- Advertisement -

हायलाइट्स:

  • मराठा आरक्षणाचे आक्रमक पडसाद
  • साताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक
  • भाजप कार्यकर्त्यांचं कृत्य असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप

सातारा :मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर राज्यभरातील मराठा समाजात मोठी नाराजी आहे. या मुद्द्यावरून राजकीय वातावरणही तापलं आहे. अशातच साताऱ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे.

साताऱ्यात सकाळच्या सुमारास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक झाली. दगडफेकीनंतर आवाज आल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कार्यालयाबाहेर आले, तेव्हा त्यांनी काही अज्ञात इसम पळून जाताना दिसले. याबाबत प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली आहे.

राज्यात आजघडीला ऑक्सिजन व रेमडेसिवीरचा साठा किती?; ही पाहा आकडेवारी

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याचं बोललं जात असलं तरीही भाजप कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याचा आरोप काँग्रेस व राष्ट्रवादीने केला आहे.

दरम्यान, दगडफेकीच्या घटनांची गंभीर दखल सातारा पोलिसांनी घेतली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती आहे.

फोन टॅपिंगः आयपीएस रश्मी शुक्ला यांना दिलासा

गृहराज्यमंत्र्यांच्या घराबाहेरही प्रदर्शने

राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हेदेखील सातारा जिल्ह्यातूनच येतात. मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाबाहेरही गोवऱ्या पेटवून निषेध व्यक्त करण्यात आला.

Source link

- Advertisement -