कोण आहे दीप्ती देवी?
दीप्तीचा जन्म पुण्याचा आहे. ती मूळ गुजराती आहे. ‘अवघाचि संसार’ या मालिकेतून ती घराघरांत पोहोचली .
त्यानंतर तिने अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये अभिनय केला. ‘मला सासू हवी’ या मालिकेत तिनं मध्यवर्ती भूमिका साकारली होती. या मालिकेमुळ ती पुन्हा प्रकाशझोतात आली होती. आता बिग बॉसच्या निमित्तानं पुन्हा एकदा तिच्या नावाची चर्चा सुरू आहे.
तसंच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नेहा जोशी आणि संग्राम समेळ ही दोन नावं पुढं आली आहेत. चॅनलच्या टीमकडून संग्रामला शोमध्ये सहभागी होण्यासाठी कॉल करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळं खरंच हे दोन्ही कलाकार बिग बॉस मराठीच्या घरात दिसतील का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. त्याचसोबत संग्रामची पहिली पत्नी अभिनेत्री पल्लवी पाटील हीदेखील या नव्या सीझनमध्ये स्पर्धक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
२०२० साली करोनामुळे ‘बिग बॉस मराठी‘चा तिसरा सीझन लांबणीवर गेला होता. परंतु हाच तिसरा सीझन जुलै महिन्याच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सूत्रांकडून कळलं आहे.